मुंबई : ट्रस्टच्या निधीद्वारे चालवल्या जाणाऱ्या मुंबईच्या लिलावती रुग्णालयात काळी जादू करण्यात आल्याचे वृत्त आहे. सेलिब्रेटींचे रुग्णालय अशीही लिलावती रुग्णालयाची ओळख आहे. राजकारण, क्रीडा, मनोरंजन क्षेत्राशी संबंधित दिग्गज उपचारांसाठी लिलावती रुग्णालयात येतात. यामुळे मुंबईसह देशभर ख्याती असलेल्या या रुग्णालयात जमिनीखाली पुरलेले आठ कलश आढळले आहेत. या कलशांमध्ये माणसांची हाडं आणि केस आहेत. पुरुन ठेवलेल्या या कलशांची स्थिती बघून त्यांचा वापर काळी जादू करण्यासाठी झाला असल्याचे मत बघणाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
Mumbai Local Train : चालत्या लोकलमध्ये महिलांच्या डब्यावर फेकली दारूची बाटली! अल्पवयीन मुलगी जखमी
याआधी ट्रस्टच्या निधीचा गैरवापर झाला आणि लिलावती रुग्णालयात १२०० कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप झाला. आता रुग्णालयात काळी जादू करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. यामुळे रुग्णांना बरे करण्यासाठी प्रसिद्ध असलेले रुग्णालय सध्या वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. लिलावती रुग्णालय ट्रस्टचे कार्यकारी संचालक परमबीर सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन रुग्णालयात काळी जादू करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे.
लिलावतीच्या माजी ट्रस्टींनी ट्रस्टच्या निधीचा गैरवापर करुन १२०० कोटी रुपयांचा घोटाळा केला, असा आरोप रुग्णालयाचे संचालक प्रशांत मेहता यांनी केला. पाठोपाठ लिलावती रुग्णालय ट्रस्टचे कार्यकारी संचालक परमबीर सिंग यांनी
रुग्णालयात काळी जादू करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे. आर्थिक घोटाळा प्रकरणी लिलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टने या प्रकरणात वांद्रे पोलिसांसह ईडीकडे तक्रार केली आहे. निधी गैरवापर प्रकरणी तपास करण्याचे निर्देश वांद्रे न्यायालयाने दिले आहेत. पोलीस काळी जादू प्रकरणाचा तपास करत आहेत.