मुंबई : मुंबईत सध्या खासगी विकासकांकडून पुनर्विकास सुरू असून इमारती बांधण्याचा सपाटा सुरू आहे. पुनर्विकास करताना म्हाडाच्या संक्रमण शिबिरात या रहिवाशांना भाड्याने जागा दिली जाते.(MHADA) मुंबईतील १४ खासगी विकासकांनी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील शेकडो गाळे भाडेतत्त्वावर घेतले असून गेल्या ८ वर्षांत २९२ कोटी ३८ लाखांची थकबाकी ठेवली आहे. या विकासकांनी १५ दिवसांच्या आत पैसे भरले नाहीत तर त्यांनी भाड्याने घेतलेले गाळे सील केले जातील, असा इशारा राज्य सरकारच्या वतीने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिला.
https://prahaar.in/2025/03/12/happy-holi-wishesh-the-festival-of-shimga-is-here/
जुन्या चाळी, झोपडपट्ट्या, इमारती यांच्या पुनर्विकासाचा वेग वाढला आहे. पुनर्विकास करताना विकासकांकडून रहिवाशांसाठी म्हाडाची संक्रमण शिबिरे भाड्याने घेतली जातात.(MHADA) या गाळ्यांचे भाडे विकासक वर्षानुवर्षे भरत नसल्यामुळे त्यांची थकबाकी कोट्यवधींच्या घरात पोहोचली आहे. यावर विधान परिषदेत भाजपा सदस्य प्रसाद लाड यांनी विचारलेल्या प्रश्नावर माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिले.
म्हाडाने १ एप्रिल २०१६ ते जानेवारी २०२५ पर्यंत या आठ वर्षांत २७४ कोटी ३८ लाखांची वसुली केली. जानेवारी २०२५ पर्यंत थकबाकीची रक्कम १७२ कोटी ५४ लाख व त्यावरील विलंब दंड ११९ कोटी ८४ लाख असे मिळून २९२ कोटी ३८ लाख थकबाकी शिल्लक आहे. थकबाकी ठेवणाऱ्या १४ पैकी ६ विकासकांवर कारवाई करत त्यांना बांधकाम थांबवण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. १२ विकासकांना थकबाकी भरत नाहीत तोपर्यंत इतर परवानग्या देऊ नये, असे निर्देश म्हाडा व एसआरएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती माधुरी मिसाळ यांनी दिली.