
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नवी मुंबई महापालिका आयुक्त आणि जिल्हापरिषद सीईओना आदेश
आमदार राजेश मोरे यांच्यासह विकास समितीने घेतली उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट
कल्याण : नवी मुंबई महापालिकेलगत असलेली १४ गावांचा महापालिकेत समावेश करून या गावाचा विकास केला जावा यासाठी आज कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे (Rajesh more) यांनी विकास समिती सदस्यांबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी १४ गावाच्या निधीबाबत सकारात्मकता दाखविताना या गावामधील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे तसेच प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढण्याचे निर्देश नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे आणि जिल्हापरिषद सीईओ यांना दिले आहेत.
नवी मुंबई लगतची १४ गावे महापालिकेतून बाहेर काढण्याबाबत मंत्री गणेश नाईक (Ganesh naik) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांना पत्र दिले आहे. मात्र या गावातील संघर्ष विकास समितीला ही गावे महापालिकेतच हवी असून याबाबत यापूर्वी देखील संघर्ष समितीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले होते. यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी मागील वर्षीच्या मार्च महिन्यात ही गावे महापालिकेतच राहतील असे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. या निर्णयाची तातडीने अमलबजावणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी आज झालेल्या बैठकीत केली. त्याचबरोबर या गावाचे दप्तर आजच्या आज ताब्यात घेत आयुक्तांनी या गावात सुरु असलेल्या विकास कामाचा वेग वाढविण्याचे निर्देश आयुक्त कैलास शिंदे यांना दिले.

मुंबई : सुनील भारती मित्तल यांच्या 'भारती एअरटेल' पाठोपाठ मुकेश अंबानींच्या रिलायन्स समुहातील 'जिओ'ने अॅलन मस्कच्या 'स्पेस एक्स'शी करार केला आहे. या ...
त्यानंतर लगेचच आमदार राजेश मोरे यांनी नवी मुंबई येथील आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह १४ गाव संघर्ष समितीला सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली आणि १४ गावे नवी मुंबई महापालिकेत ठेवण्या संदर्भात पत्र दिले. यावेळी त्यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख भरत भोईर, गणेश जेपाल, लक्ष्मण पाटील, गुरुनाथ पाटील, सुखदेव पाटील, भरत काळू भोईर, लक्ष्मण येदरकर, चेतन पाटील, काळूराम पाटील, महादेव जाधव, मनोज पाटील हे विकास समितीचे सदस्य उपस्थित होते.