मुंबई : सुनील भारती मित्तल यांच्या ‘भारती एअरटेल’ पाठोपाठ मुकेश अंबानींच्या रिलायन्स समुहातील ‘जिओ’ने अॅलन मस्कच्या ‘स्पेस एक्स’शी करार केला आहे. या करारांमुळे भारतात लवकरच स्टारलिंकची सेवा मिळेल. यामुळे मोबाईल टॉवरशिवाय इंटरनेट उपलब्ध होईल. दुर्गम भागात तसेच ग्रामीण भागात जिथे नेटवर्कच्या मर्यादेमुळे अनेकदा मोबाईलवरुन बोलणेही कठीण असते अशा ठिकाणी स्टारलिंकमुळे इंटरनेट पोहोचेल. स्टारलिंकची सेवा मिळाल्यावर संपर्क करणे, माहितीचे आदानप्रदान करणे आणखी सोपे आणि वेगवान होणार आहे.
Media Release – Jio to bring SpaceX’s Starlink high-speed internet to its customers pic.twitter.com/8LjIWfAxs3
— Reliance Industries Limited (@RIL_Updates) March 12, 2025
Airtel announces an agreement with @SpaceX to bring Starlink’s high-speed internet services to its customers in India. This is the first agreement to be signed in India, which is subject to SpaceX receiving its own authorizations to sell @Starlink in India. It enables Airtel and… pic.twitter.com/5MxViKxh9C
— Bharti Airtel (@airtelnews) March 11, 2025
‘भारती एअरटेल’ने मंगळवार ११ मार्च आणि ‘जिओ’ने बुधवार १२ मार्च रोजी ‘स्पेस एक्स’शी करार करुन स्टारलिंकची सेवा भारतात देणार असल्याचे जाहीर केले. यामुळे देशातल्या दूरचंचार क्षेत्राच्या प्रगतीचा वेग आणखी वाढणार आहे. अमेरिकेतली ट्रम्प प्रशासनात मंत्री असलेल्या अॅलन मस्क यांनी राजकारणात प्रवेश करण्याआधीच ‘स्पेस एक्स’ कंपनीद्वारे विविध सेवा देण्यास सुरुवात केली. स्टारलिंक ही ‘स्पेस एक्स’द्वारे पुरवली जाणारी एक लोकप्रिय सेवा आहे. उपग्रह-आधारित हाय-स्पीड इंटरनेट सेवा देण्यासाठी ‘स्पेस एक्स’ कंपनीने स्टारलिंक हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. जिथे मोबाईल टॉवर नाही, वायर इंटरनेट नाही; त्या ठिकाणी उपग्रहांच्या मदतीने हाय-स्पीड इंटरनेट सेवा देण्याचे काम स्टारलिंक या तंत्रज्ञानाद्वारे केले जाते. स्टारलिंकचे उद्दिष्ट जगभरात हाय-स्पीड इंटरनेट प्रदान करणे आहे हेच आहे.
पृथ्वीपासून सुमारे ५५० किलोमीटर उंचीवर असलेल्या लो अर्थ ऑर्बिट (LEO) मध्ये हजारो उपग्रह आहेत. हे उपग्रह लेसर लिंक्सच्या मदतीने एकमेकांशी जोडले जातात आणि उच्च वेगाने डेटा प्रसारित करतात. स्टारलिंक सेवा वापरण्यासाठी, एक लहान डिश घराच्या खिडकीत वा बाल्कनीत बसवली जाते. ही डिश उपग्रहांकडून सिग्नल मिळवून पुढे पाठवते. घरात बसवलेली डिश वायफायच्या राउटरला जोडून विना टॉवर हाय-स्पीड इंटरनेट वापरता येते.