Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीIndia Pollution : भारतातील १३ शहरे वायू प्रदूषणाच्या विळख्यात

India Pollution : भारतातील १३ शहरे वायू प्रदूषणाच्या विळख्यात

नवी दिल्ली : वायू प्रदूषण हे जगातील अनेक देशांसमोरील सर्वात मोठ्या समस्यांपैकी एक आहे. भारतही या समस्येशी मुकाबला करत असतानाच आता भारतीयांची आणखी चिंता वाढवणारी माहिती स्विस एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी कंपनी ‘आयक्यूएअर’ने जारी केलेल्या वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्टमधून समोर आली आहे. कारण जगातील २० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी १३ शहरे भारतातील आहेत. विशेष म्हणजे आसाममधील बर्निहाट हे शहर भारतातील सर्वाधिक वायू प्रदूषित शहरांपैकी एक ठरले आहे.(top 20 polluted cities in world)

MHADA : १५ दिवसांत पैसे भरा, अन्यथा गाळे सील करणार

स्विस एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी कंपनी ‘आयक्यूएअर’ने जारी केलेल्या वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट २०२४ मध्ये असे म्हटले आहे की, ‘भारतातील दिल्ली ही जागतिक स्तरावर सर्वात वायू प्रदूषित राजधानी ठरली आहे. जगातील चौथ्या क्रमाकांचे वायू प्रदूषित शहरही ठरले आहे. २०२४ मध्ये भारत जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात वायू प्रदूषित देश बनला होता, तर २०२३ मध्ये ते तिसऱ्या स्थानावर होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -