Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीChhatrapati Sambhaji Maharaj Statue : छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासमोरील रोहित्र स्ट्रक्चर हलवणार

Chhatrapati Sambhaji Maharaj Statue : छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासमोरील रोहित्र स्ट्रक्चर हलवणार

आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नांना यश

खासदार नारायण राणे यांनी मंजूर केला निधी

रत्नागिरी  : कसबा संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथील रोहित्र स्ट्रक्चर अन्य ठिकाणी हलविण्याचे काम येत्या दोन दिवसांत सुरू होणार आहे. कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे १०० केव्हीए आणि २०० केव्हीए रोहित्रे उभी होती. मात्र त्यामुळे स्मारकाजवळ अडचण निर्माण होत असल्याने ती हलवण्याची मागणी स्थानिकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी आयोजित कार्यक्रमात कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्याकडे केली होती. माजी केंद्रीय मंत्री रत्नागिरी सिंधदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निधी मंजुरीसाठी पत्र दिले.

स्वारगेट एसटी डेपोत तरुणीवर बलात्कार, चौघांचे निलंबन आणि २२ जणांची बदली

यानुसार रत्नागिरीच्या जिल्हा वार्षिक योजनेमध्ये या रोहित्र स्ट्रक्चर स्थलांतरणासाठी २२ लाख ६९ हजार ९६८ रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला. याबाबतची कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशा सूचना खा. नारायण राणे यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या होत्या. त्यानुसार या कामाचा निधी महावितरणकडे वर्ग झाला असून येत्या दोन दिवसांत ही रोहित्रे हलविण्यात येणार आहेत. गतिमानतेने झालेल्या या कामाबद्दल आमदार निलेश राणे आणि खासदार नारायण राणे यांचे आभार मानण्यात येत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -