Sunday, March 23, 2025
Homeमहाराष्ट्रदैवं बलवत्तर म्हणून श्वानाने वाचविले रखवालदाराचे प्राण

दैवं बलवत्तर म्हणून श्वानाने वाचविले रखवालदाराचे प्राण

डेअरीमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

राहता : राहता येथील चितळी रोडवरील १५ चारी परिसरात असलेल्या सुनील शांताराम सदाफळ यांच्या पंचकृष्णा डेअरी प्रोडक्सच्या प्रांगणात बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास दोन बिबट्यांनी प्रवेश करून डेअरीच्या लॅबमध्ये जोरदार भांडणातून लॅब साहित्यांचे मोठे नुकसान केले.

यापूर्वी गेटजवळ राखण करणाऱ्या राखणदारावर बिबट्याने हल्ला करण्यापूर्वीच भयभीत झालेल्या श्वानाने रखवालदाराजवळ भुंकत जाऊन त्यास जागे केले. केवळ दैव बलवत्तर म्हणून या प्रसंगातून रखवालदाराचे प्राण या श्वानाने वाचवले. गेल्या अनेक दिवसांपासून राहाता येथील १५ चारी परिसरात तसेच जवळपासच्या परिसरात बिबट्यांचा मोठा वावर वाढतोय. अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या, जनावरे व कुत्रे यांचा फरशा बिबट्यांनी केल्याच्या घटना घडत आहेत. काल पहाटे साडेपाचच्या सुमारास दोन बिबट्याने पंचकृष्णा डेअरी प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला. गेटवर असलेला रखवालदार झोपेत असल्याने त्याच्याकडे जाणाऱ्या बिबट्यास पाहून तेथे असलेल्या कुत्र्यांनी जोरदार भुंकण्यास सुरुवात केली.

अंगणवाडी सेविकांच्या भत्त्याची प्रतीक्षा संपली

त्यामुळे रखवालदारास जाग आली. बिबट्यास पाहून भयभीत रखवालदाराने यास हाकलण्यास प्रयत्न केला. बिबट्याने यावेळी जवळच असलेल्या लॅबमध्ये प्रवेश केला. दरवाजा बंद झाल्यामुळे बिथरलेल्या बिबट्याने आतमध्ये दूध चेक करण्याच्या अनेक लॅब साहित्याचे मोठे नुकसान केली. बाहेर पडण्यासाठी रस्ता मिळत नसल्यामुळे कार्यालयाच्या जाड काचेला धडक देत काच फोडून बिबट्या बाहेर पळाला. जवळच असलेल्या शेतामध्ये बिबट्या फरार झाला. बिबट्याचा हा थरथराट पाहण्यासाठी आजूबाजूच्या अनेक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.दत्तात्रय सदाफळ यांनी ही बातमी सुनील सदाफळ यांना फोनवर कळवून घटनास्थळी बोलावून घेतले.

या प्रकारानंतर चितळी रोड व १५ चारी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यांचा मोठा वावर असून या परिसरातील शेतकरी अत्यंत भयभीत आहेत. शासनाने व वन विभागाने या परिसरात आजच्या घटनेची गंभीरपणे दखल घेऊन त्वरित सर्व भागात पिंजरे लावून मोकाट वावरणाऱ्या बिबट्यांचा बंदोबस्त करावा व भयभीत शेतकऱ्यांना भयमुक्त करावे. – सुनील सदाफळ, पंचकृष्ण डेअरी मालक, राहाता

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -