Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Onion : उन्हाळी कांद्याची आवक वाढली!

Onion : उन्हाळी कांद्याची आवक वाढली!

पुणे : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागात उन्हाळी कांदा काढणीला सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात कांद्याला प्रती १० किलोला २७० ते ३०० बाजारभाव मिळत होता. त्यामुळे उन्हाळी कांदा काढल्यामुळे शेतकरी लगेच विक्रीसाठी आणू लागल्याने सर्वत्रच आवक वाढल्याने बाजार भाव कोसळले असून प्रती १० किलोला १७० ते १८० बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.


लोणी येथील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात एकूण २६०७ कांदा पिशवीचे आवक झाली एक नंबर गोळा कांदा प्रती दहा किलो कांदा १७० ते १८० रुपये या भावाने विकला गेला आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात यांनी दिली.



लोणी बाजार आवारात कांद्याची आवक वाढल्याने बाजारभाव कमी झाले आहेत. शेतकरी शेतात काढलेला कांदा लगेच विक्रीसाठी आणत आहेत. कांद्याचे प्रति दहा किलोचे दर एक नंबर गोळा कांदा १७० ते १८० रुपये , दोन नंबर कांदे १३० ते १६० रुपये, गुलटी कांदा ६० ते १२० रुपये, बदला कांद्यास ३० ते ५० रुपये असा बाजारभाव मिळाला आहे.

Comments
Add Comment