Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

Pune Gaurav Ahuja : पुणे पोलिसांनी बड्या बापाच्या उद्दाम मुलाचा माज धिंड काढून उतरवला

Pune Gaurav Ahuja : पुणे पोलिसांनी बड्या बापाच्या उद्दाम मुलाचा माज धिंड काढून उतरवला

पुणे : विद्येचं माहेर घर मानल्या जाणाऱ्या पुण्यात गुन्ह्यांचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचं पुण्यात काही दिवसांपूर्वी दोन बड्या घरातील मुलांनी नशेत अश्लील कृत्य केल्याचं समोर आलं. याप्रकरणी गौरव अहुजा (Gaurav Ahuja) आणि त्याचा मित्र भाग्येश ओसवाल यांना बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर त्यांनी ज्या ठिकाणी हे कृत्य केले त्याच ठिकाणी पोलिसांनी त्यांची धिंड काढल्याचे समोर आले आहे.

काही दिवसांपूर्वी गौरव अहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश ओसवाल यांचा अश्लील व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. शोधमोहिमेनंतर पोलिसांना भाग्येश ओसवाल याला अटक करण्यात यश आलं मात्र गौरव अहुजा फरार झाला होता. घटनेच्या काही तासानंतर गौरव अहुजा (Pune Gaurav Ahuja) हा कराड पोलिसांना सरेंडर झाला होता. तसेच त्याने सोशल मीडियावरही व्हिडीओ शेअर करुन माफी मागितली होती. आपण कराड पोलिसांना शरण येत असून सर्व पुणेकरांची माफी मागतो, मला एक संधी द्या असा व्हिडिओ त्याने व्हायरल केला. त्यानंतर येरवडा पोलिसांनी त्याचा ताबा घेतला. गौरवने ज्या ठिकाणी हे कृत्य केलं होतं, त्याच ठिकाणाहून सोमवारी त्याची आणि त्याच्या मित्राची धिंड काढत पोलिसांनी त्यांचा माज उतरवला आहे.

या प्रकरणी गौरव अहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश ओसवाल यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. ही कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही न्यायालयात हजर केले असता पुणे सत्र न्यायालयाने गौरव आहुजाला एक दिवसाची पोलीस कोठडी तर भाग्येश ओसवाल याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी केलेल्या या कृत्याचे समाज माध्यमांवर कौतुक केले जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >