Health: रिकाम्या पोटी जरूर खा ड्रायफ्रुट्स, कधीही येणार नाही पोटाची समस्या

मुंबई: तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या खाण्याच्या सवयींवरून तुमचे आरोग्य ठरते. याच कारणामुळे आरोग्यतज्ञ नेहमी पौष्टिक आणि संतुलित आहार घेण्याचा सल्ला देता. जर तुम्हाला फिट आणि स्वस्थ राहायचे आहे तर तुम्हाला तुमच्या आहाराचे काही नियम पाळावेच लागतील. यासाठी तुमच्या आहारात तुम्ही ५ सुक्या मेव्यांचा समावेश करू शकता.



पिस्ता आरोग्यासाठी वरदान


पिस्तामध्ये प्रोटीन, फायबर आणि व्हिटामिन बी ६ सारखी पोषकतत्वे असतात. यामुळे संपूर्ण आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. सुक्या मेव्यामुळे आतड्यांचे आरोग्य आणि डोळ्यांचे आरोग्य चांगले राखले जाते.



डाएटमध्ये अक्रोडचा करा समावेश


आरोग्य तज्ञांनुसार अक्रोड तुमच्या आरोग्यासाठी वरदान सिद्ध होऊ शकते. रोज सकाळी अक्रोडचे सेवन केल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्य चांगले राहते सोबतच मेंदूचे आरोग्यही चांगले राहते.



खजूरचे सेवन करू शकता


तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक राहायचे असेल तर दररोज रिकाम्या पोटी खजूरचे सेवन सुरू करा. यामुळे मांसपेशी तसेच हाडे मजबूत होण्यास मदत होते.



बदामाला डाएटमध्ये सामील करा


सकाळी सकाळी रिकाम्या पोटी बदाम खाणेही आरोग्यासाठी फायदेशीर आहे. प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, आर्यन, कॉपर आणि झिंकसह अनेक पोषकतत्वांनी परिपूर्ण असलेले बदाम कोलेस्ट्रॉल तसेच ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत करतात.



मनुक्याचे सेवन फायदेशीर


मनुक्यांमध्ये आढळणारी पोषतत्वे तुमचे आरोग्य मजबूत राखण्यास मदत करतात. मनुक्यांमुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राखले जाते.

Comments
Add Comment

उष्ण पदार्थांचे अति सेवन : उच्च रक्तदाब आणि त्वचेच्या समस्यांचे प्रमुख कारण !

मुंबई : आयुर्वेद हा भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये शरीराच्या संतुलनावर विशेष

साथींच्या आजारापासून मुलांना दूर ठेवा

विनायक बेटावदकर गणपती उत्सवापूर्वी सुमारे पंधरा दिवस, गणपती उत्सवात कल्याण शहर, ग्रामीण भागाचे हवामान साधारण

Sleep: शांत आणि गाढ झोपेसाठी या युक्त्या वापरून पहा

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात पुरेशी आणि शांत झोप मिळवणे अनेक लोकांसाठी एक आव्हान बनले आहे. निद्रानाश (Insomnia) ही

Health: साखरच नव्हे तर या पदार्थांमुळे तुमचे दात होतात खराब, वेळीच लक्ष द्या नाहीतर...

मुंबई: साखर आणि गोड पदार्थ खाल्ल्याने दातांना कीड लागते हे आपल्याला माहीत आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत जे गोड

Health: वयाच्या चाळीशीनंतर पुरुषांनी फिट राहण्यासाठी जरूर खा या ७ गोष्टी

मुंबई : सध्याच्या धावपळीच्या जीवनात आणि अनियमित जीवनशैलीमुळे अनेक पुरुषांना चाळीशीनंतर आरोग्याच्या अनेक

Health: दही कधी खावे? वजन घटवण्यासाठी योग्य वेळ कोणती?

मुंबई : वजन घटवण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी दही एक उत्तम पर्याय आहे. पण अनेकदा प्रश्न पडतो की दही दिवसा खाणे