
नवी दिल्ली : कालपासून टेस्लाच्या शेअरमध्ये (Tesla Shares) होणाऱ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना (Investors) मोठा धक्का बसला आहे. यातच आता इंडसइंड बँकेच्या शेअर्सचाही (Indusind Bank Shares) समावेश झाला आहे. आजचा भारतीय व्यवहार सुरु होताच सेन्सेक्स आणि निफ्टी (Sensex and Nifty) कोसळले आहे. यामध्ये खासगी क्षेत्रातील इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण झाली. त्यामुळे खासगी क्षेत्रातील दिग्गज इंडसइंड बँकेला मोठा झटका बसला आहे. (Sensex and Nifty Falls)

मुंबई : वॉर' चित्रपटाच्या यशानंतर 'यश राज स्पाय युनिव्हर्स' चा 'वॉर- २' (War 2) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या हृतिक रोशन (Hrithik Roshan) त्याच्या ...
मिळालेल्या माहितीनुसार, इंडसइंड बँकेच्या शेअरची किंमत आजच्या व्यवहाराच्या सुरुवातीलाच २० टक्क्यांनी घसरली. यामुळे आता इंडसइंड बँकेचा शेअर ७२०.३५ रुपयांवर पोहोचला आहे. याबाबत बँकेला मिळालेल्या अहवालानुसार डिसेंबर २०२४ पर्यंत तिच्या निव्वळ संपत्तीवर सुमारे २.३५% च्या प्रतिकूल परिणामाचा अंदाज व्यक्त केला होता. तर स्टॉकमधील ही घसरण मार्च २०२० नंतरची सर्वाधिक होती.
शेअरचे डाउनग्रेड
इंडसइंड बँकेच्या शेअर्सवर आज मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव आला. खासगी बँकेच्या डेरिव्हेटिव्ह्ज पोर्टफोलिओमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती झाल्यामुळे कमकुवत कमाईच्या दृष्टीकोनातून विश्लेषकांनी डाउनग्रेड केले. बाजारातील विश्लेषकांनी बँकेतील सततच्या नकारात्मक घडामोडींमुळे आणि कर्जदात्याच्या विश्वासार्हतेला धक्का ण्याची भीती व्यक्ती केली आहे. तसेच स्टॉक 'होल्ड' वरून 'रिड्यूस' वर खाली आणला आहे. (Indusind Bank Shares)
आजचा सेन्सेक्स कोसळला
मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात खूपच खराब झाली. बीएसई सेन्सेक्स ७४,११५.१७ च्या आधीच्या बंदच्या तुलनेत ७३,७४३.८८ वर उघडला आणि काही मिनिटांतच तो ४०० हून अधिक अंकांनी घसरला आणि ७३,६७२ च्या पातळीवर घसरला. दुसरीकडे, एनएसईचा निफ्टी निर्देशांक (एनएसई निफ्टी) देखील सेन्सेक्सच्या पावलावर चालताना दिसत आहे. सोमवारच्या २२,४६०.३० च्या बंदच्या तुलनेत ते २२,३४५.९५ वर उघडले आणि काही मिनिटांत १३० हून अधिक अंकांनी घसरून २२,३१४ च्या पातळीवर व्यवहार करताना दिसले. (Indusind Bank Shares)