Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडीUSA Plane Crash : धक्कादायक! अमेरिकेत पुन्हा विमान अपघात

USA Plane Crash : धक्कादायक! अमेरिकेत पुन्हा विमान अपघात

वॉशिंग्टन : अमेरिकेतील पेनसिल्व्हेनियामध्ये एक मोठा अपघात झाला आहे. पेनसिल्व्हेनियामध्ये ५ जणांना घेऊन जाणारे एक छोटे विमान कोसळले असल्याचे म्हटले जात आहे. याविषयीची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. या अपघातात विमानातील (USA Plane Crash) पाचही प्रवासी बचावले आहेत.

अंगणवाडी सेविकांच्या भत्त्याची प्रतीक्षा संपली

मिळालेल्या माहितीनुसार, फिलाडेल्फियाच्या पश्चिमेस सुमारे ७५ मैल (१२० किमी) अंतरावर असलेल्या मॅनहाइम टाउनशिपमधील ब्रेथ्रेन व्हिलेज या निवृत्ती गृहाजवळ रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या विमानात ५ जण प्रवास करत होते. या भीषण अपघातात विमानात प्रवास करणारे पाचही प्रवासी बचावले, त्यांच्या प्रकृतीबद्दल अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. विमानातील सर्व लोकांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. तर शेजारी असणारी अनेक वाहने नष्ट झाली.

या अपघाताची माहिती मिळताच, लँकेस्टर विमानतळावरून अग्निशमन दलाचे एक पथक काही मिनिटांतच अपघातस्थळी पोहोचले. यानंतर अतिरिक्त आपत्कालीन पथके देखील आली. तीव्र उष्णता आणि धुरामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणणे कठीण होत होते. या अपघातात (USA Plane Crash) सुमारे एक डझन वाहनांचे नुकसान झाले.

फ्लाइटअवेअरच्या मते, विमान लँकेस्टर विमानतळावरून उड्डाण करून ओहायोतील स्प्रिंगफील्डला जाणार होते. फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) ने सांगितले की ते अपघाताची चौकशी करेल. जानेवारीपासून अमेरिकेत विमान अपघातांमध्ये वाढ झाली आहे.

अपघात पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी याविषयी माहिती देताना सांगितले की, “विमान अचानक डावीकडे वळले आणि नंतर खाली पडले. यानंतर ते लगेचच आगीच्या गोळ्यात बदलले. पिपकिनने ताबडतोब ९११ ला फोन केला आणि तो घटनास्थळी पोहोचला. त्याच्या व्हिडिओ फुटेजमध्ये ढिगाऱ्यातून काळा धूर निघत असल्याचे आणि अनेक गाड्यांना आग लागल्याचे दिसून आले. या अपघातात तीन मजली निवासी इमारत थोडक्यात बचावली.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -