मुंबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या फायनलमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडला ४ विकेटनी हरवले. या विजयानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या निवृत्तीबाबत मोठे विधान केले. तो म्हणाला की जसे सुरू आहे तसेच सुरू राहील.
कर्णधार रोहितने हे ही स्पष्ट केले की तो वनडे फॉरमॅट इतक्यात तरी सोडणार नाही. ३७ वर्षीय रोहितला सामन्यानंतर निवृत्तीबाबत विचारणा केली. यावेळेस तो म्हणाला, कोणताही फ्यूचर प्लान नाही. जसे सुरू आहे तसेच सुरू राहील. मी या फॉरमॅटमधून निवृत्ती घेत नाही आहे. कोणत्याही अफवा पसरवू नका.
हिटमॅन रोहितने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये ४१ बॉलमध्ये अर्धशतक झळकावले. सामन्यात रोहितने ८३ बॉलमध्ये ७६ धावा केल्या. त्याने या खेळीदरम्यान ३ षटकार आणि ७ चौकार ठोकले.
कर्णधार रोहित फायनलनंतर म्हणाला की, मी त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. येथील गर्दी शानदार होती. हे आमचे घरचे मैदान नाही मात्र तरीही आमचेच मैदान असल्यासारखे वाटत होते. येथे चाहत्यांची गर्दी मोठी होती. जेव्हा तुम्ही अशा पिचवर खेळत असता तेव्हा खूप जास्त अपेक्षा असतात. आम्ही त्यांची ताकद समजतो आणि याचा फायदा उचलतो.
रोहित पुढे म्हणाला, केएल राहुलचे डोके मजबूत आहे. तो कधीही आपल्या आसपास तणाव फिरकू देत नाही. याच कारणामुळे त्याला मधल्या फळीत ठेवायचे आहे. जेव्हा तो फलंदाजी करतो आणि स्थितीच्या हिशेबाने योग्य शॉट खेळतो तेव्हा तो हार्दिक पांड्यासारखा खेळाडूंना खुलेपणाने खेळण्याचे स्वातंत्र्य देतो.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…