Sunday, March 16, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणHoli Special Kokan Bus : खासगी बसच्या किंमतीत वाढ झाल्याने चाकरमान्यांची होळी...

Holi Special Kokan Bus : खासगी बसच्या किंमतीत वाढ झाल्याने चाकरमान्यांची होळी आधीच बोंबाबोंब

मुंबई : काही दिवसांवर होळी आली असून कोकणातील चाकरमान्यांना गावी जायचे वेध लागले आहेत. कोकणात शिमगोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.(Holi Special Kokan) गावोगावी पालख्या नाचवल्या जातात, होळी दहन केली जाते, शंकासुर येतो, पुरणपोळीचा बेत आखला जातो. जणू कोकणातल्या प्रत्येक घरात देवाचं आगमन होत. याचं देवाच्या आगमनाला चाकरमानी कोकणाच्या दिशेने रवाना होतात. मात्र यावर्षी खासगी बसच्या किंमतीत वाढ झाल्याने चाकरमान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.

Madhya Pradesh : मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि SUV च्या धडकेत ८ जणांचा मृत्यू १४ गंभीर

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई ते रत्नागिरीदरम्यान ४०० ते ६०० रुपये असलेला खासगी बसचा दर सध्या ६०० ते ८०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. वातानुकूलित आसनी आणि शयनयान श्रेणीतील बसगाड्यांचे भाडेदर १,५०० रुपयांपासून आहेत. एसटी गाड्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. यामुळे अधिकचे भाडे भरून खासगी बसने प्रवास करण्यासाठी प्रवाशांची पसंती आहे. असे असले तरी खासगी बसला सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत केली जात नाही. एसटी गाड्यांच्या तुलनेत खासगी वातानुकूलित आसनी आणि शयनयान श्रेणीतील बसगाड्यांची स्थिती चांगली असते. सणासुदीच्या हंगामातच आणि एसटी भाडेदराच्या दीडपटीपर्यंतच खासगी बस चालक-मालकांकडून वाढीव दर आकारण्यात येतात. दरम्यान, ऑनलाइन बस आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीटदरात १० ते १५ टक्के सवलत मिळत आहे. या उदभवलेल्या प्रश्नांवर सरकार काय निर्णय घेणार याकडे चाकरमान्यांचे लक्ष लागले आहेत.(Holi Special Kokan)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -