Wednesday, May 14, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजविधिमंडळ विशेषमहत्वाची बातमी

Maharashtra Budget 2025 : लाडक्या बहिणींसाठी २१०० रुपये कधी? अजित पवार म्हणाले...

Maharashtra Budget 2025 : लाडक्या बहिणींसाठी २१०० रुपये कधी? अजित पवार म्हणाले...

मुंबई : महायुती सरकारच्या या पहिल्या अर्थसंकल्पात (Maharashtra Budget 2025) अर्थमंत्री अजित पवार यांनी “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी” एकूण ३६ हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित असल्याची माहिती दिली. यावेळी विरोधकांनी लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार? असा प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार यांनी अर्थसंकल्प होऊ द्या, असे उत्तर दिले.


अजित पवार यांनी पुढे म्हटले की, लाडक्या बहिणींसाठी टेक कंपनी मायक्रोसॉफ्ट सोबत राज्य सरकार करार करणार आहे. या कंपनीच्या माध्यमातून हजारो महिलांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे म्हणजे एआयचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची १०० टक्के प्रतिपूर्ती करण्यात येत आहे. मान्यताप्राप्त उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या आणि ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थिनींना हा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.



लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत सुमारे २ कोटी ५३ लाख लाभार्थी महिलांना जुलै २०२४ पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी ३३ हजार २३२ कोटी रुपये खर्च झाला असून सन २०२५-२६ मध्ये या योजनेकरीता एकूण ३६ हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. यानंतर त्यांनी म्हटले की, या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला आहे. अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचे विचाराधीन आहे. अजित पवार यांनी अर्थसंकल्पात २१०० रुपयाबाबत कोणतीच घोषणा केली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना यावर्षी १५०० रुपयेच मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.


Comments
Add Comment