Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीMadhya Pradesh : मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि SUV च्या...

Madhya Pradesh : मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि SUV च्या धडकेत ८ जणांचा मृत्यू १४ गंभीर

भोपाळ : मध्यप्रदेशमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. मध्य प्रदेशच्या सिधी जिल्ह्यामध्ये ट्रक आणि बस यांच्यात झालेल्या धडकेत ८ जणांचा मृत्यू झाला असून १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी(दि. ९) रात्री उशीरा घडला.अपघातानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरू असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

MNS Raj Thakrey : राज ठाकरेंचं वक्तव्य हे श्रद्धाळू भाविकांचा अपमान करणारे : भाजपा नेते प्रवीण दरेकरांचा पलटवार

मिळालेल्या माहितीनुसार, मुलाच्या मुंडन समारंभासाठी सर्व नातेवाईक मिनी बसने जात असताना हा अपघात झाला. मटिहानी गावातील २२ जण एका मिनी बसमधून प्रवास करत होते. मंदिरामध्ये पोहचण्यापूर्वीच वाटेमध्ये भरधाव ट्रकने मिनी बसला समोरून जोरदार धडक दिली. रविवारी(दि. ९)मध्यरात्री अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयामध्ये पोहचण्यापूर्वी मृत्यू झाला. या अपघातामध्ये १४ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर आहे. मृत्यू झालेले सर्वजण साहू कुटुंबातील आहेत. हे सर्वजण बहरीतील देवरी आणि पंडारिया या गावातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. मृतांमध्ये ५ महिला आणि ३ पुरूषांचा समावेश आहे. या घटनेनंतर साहू कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि युद्धपातळीवर मदतकार्य करत जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्यांची प्रकृती गंभीर होती त्यांना पुढील उपचारासाठी रेवा मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले आहे. अतिवेग आणि निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -