नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील प्रयाग राज येथे नुकताच कुंभमेळा पार पडला. देश-विदेशातील कोट्यवधी भावीक कुंभमेळ्यादरम्यान येथील संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी आले होते. मात्र, काही मंडळींनी येथील पाण्याच्या शुद्धतेवर (Ganga water) आक्षेप घेतला होता. पण आता संगमावरील गंगेचे पाणी कुंभमेळ्यादरम्यान स्नानासाठी योग्य होते, असे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने लोकसभेत स्पष्ट केले आहे.
२८ फेब्रुवारी २०२५ रोजी, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे एक दीर्घ अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार, संगमाचे पाणी सर्व निर्धारित मानकांची पूर्तता करत होते आणि ते स्नानासाठी योग्य असल्याचे आढळून आले आहे.
Madhya Pradesh : मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि SUV च्या धडकेत ८ जणांचा मृत्यू १४ गंभीर
दरम्यान, कुंभमेळा काळात गंगेचे पाणी स्नान करण्यायोग्य नव्हते, असे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाला दिलेल्या माहितीत म्हटले होते? गंगेच्या पाण्यात अधिक प्रमाणावर मल-मूत्र होते? असा प्रश्न समाजवादी पक्षाचे खासदार आनंद भदौरिया यांनी लोकसभेत उपस्थित केला होता.
सेंट्रल पोल्यूशन कंट्रोल बोर्डाचा नवा अहवाल
पर्यावरण मंत्रालयाने उत्तरात सांगितले की, ३ फेब्रुवारी २०२५ रोजी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे हवाल सादर केला होता, यात १२ ते २६ जानेवारी दरम्यान करण्यात आलेल्या परीक्षणाच्या आधारे, संगमाचे पाणी स्नान करण्यायोग्य नव्हते, असे सांगण्यात आले होते. यावर, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या निर्देशानुसार, सविस्तर तपासणी करण्यात आली, यात दिवसातून दोन वेळा पाण्याची गुणवत्ता तपासण्यात आली. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सादर केलेल्या अंतिम अहवालात संगमाचे पाणी आंघोळीसाठी योग्य असल्याचे दिसून आले.