आमदार निलेश राणे यांच्या अभ्यासपूर्ण पाठपुराव्याला यश
मालवण : महाराष्ट्र शासन पर्यावरण पूरक आणि संरक्षण व व्यवस्थापन या ४५० कोटी रुपये प्रकल्पांतर्गत देवबाग (Devbag beach) येथे १५८ कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली आहे या प्रक्रियेमुळे समुद्रकिनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्य अर्थसंकल्पात याबाबत घोषणा केली आहे.
आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राज्य शासनाकडे केलेल्या अभ्यासपूर्ण पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे. मोठया प्रमाणात निधी मंजूर झाला आहे. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून गतिमान विकास सुरूच राहील. असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
अर्थसंकल्पात बंदरे विकासासाठी ४८४ कोटी तर मत्स्य विकासासाठी २४० कोटी
सर्व घटकांना न्याय देणारा परिपूर्ण अर्थसंकल्प : आमदार निलेश राणे
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२५-२६ सादर केला. खरोखरच हा अर्थसंकल्प महाराष्ट्रातील प्रत्येक समाजासाठी, प्रत्येक घटकासाठी, प्रशासनाच्या सर्व क्षेत्रांसाठीचे अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्र पर्यावरण पूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन विभागाच्या मार्फत ४५० कोटी रुपयांपैकी माझ्या मतदारसंघातील मालवण तालुक्यातील, देवबाग समुद्रकिनाऱ्यासाठी १५८ कोटी रुपये किमतीच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे समुद्रकिनारी वात्सव्यास असलेल्या नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण होईल. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार तसेच महायुती सरकारचा मनपूर्वक आभारी आहे, अशी प्रतिक्रिया आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केली आहे.