Friday, March 28, 2025
Homeक्रीडाआज रंगणार चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ फायनलचा महासंग्राम

आज रंगणार चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ फायनलचा महासंग्राम

सलग चार सामने जिंकणाऱ्या भारताचे पारडे जड

दुबई : भारतीय संघ रविवारी (दि. ९ मार्च) चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील फायनलचा सामना खेळणार आहे. दुबईतील आंतरराष्ट्रीय मैदानावर भारत व न्यूझीलंड संघांदरम्यान हा महासंग्राम रंगणार आहे. एकीकडे दुबईच्या मैदानावर सलग ४ सामने जिंकणारा भारतीय संघ आहे. तर दुसरीकडे याच मैदानावर भारताकडून पराभव स्वीकारलेला न्यूझीलंड संघ आहे. भाराताने या मैदानात जास्त सामने खेळले असले, तरी दुबईतील खेळपट्टी व हवामान सारखे बदलत असते.

हायब्रीड मॉडेलमुळे भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत खेळवण्याचा आयसीसीने निर्णय घेतला. स्पर्धेत सर्वात आधी भारताने बांगलादेशवर सहज विजय मिळवला. त्यानंतर यजमान पाकिस्तानला भारताने पराभवाची धुळ चारली. साखळी सामन्यातील अंतिम फेरीत भारताने न्यूझीलंडला पराभूत केले होते आणि सेमीफायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. आता भारतीय संघ स्पर्धेत दुसऱ्यांदा न्यूझीलंडविरूद्ध भिडणार आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार रविवारी दुपारी २.३० वाजता सुरू होणाऱ्या या सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता नाही. तर सामन्याच्या मध्यंतरापर्यंत साधारणत: ३० डीग्री सेल्सिअसपर्यंत तापमान असेल. तर जसजसा सुर्य मावळतीला जाईल तसे तापमान कमी होईल व रात्री साधारणत: २० डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे.

आत्तापर्यंत झालेल्या सामन्यांमधील परिस्थिनुसार दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावरील खेळपट्टी ही संथ आहे. सामन्याच्या सुरूवातील वेगवान गोलंदाजांना मदत होते व त्यांना सुरूवातीच्या षटकांमध्ये विकेट्स मिळू शकतात. पण जसजसा सामना पुढे जाईल तशी खेळपट्टी संथ होते. ज्यामुळे फिरकीपटूंना विकेट्स घेण्याची संधी निर्माण होते.

२०२५ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंडशी सामना होणार आहे. या सामन्यामध्ये विजेता संघाला भरघोस पैसे मिळणार आहेत, त्याचबरोबर उपविजेत्या संघालाही बक्षीस मिळणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना जिंकणारा संघ निश्चितच श्रीमंत होणार आहे. शिवाय, हरणारा संघही मालामाल होईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या स्पर्धेसाठी बक्षीस रक्कम आधीच जाहीर केली होती. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाला सुमारे १९.४८ कोटी रुपये (२.२४ दशलक्ष डॉलर्स) मिळतील. अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला, म्हणजेच उपविजेत्या संघाला अंदाजे ९.७४ कोटी रुपये (१.१२ दशलक्ष डॉलर्स) मिळतील.

यासोबतच, उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना सुमारे ४.८७ कोटी रुपये (५,६०,००० अमेरिकन डॉलर्स) इतकेच बक्षीस देण्यात आले. याचा अर्थ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे संघालाही इतके पैसे मिळणार आहेत. गट फेरीतून बाहेर पडलेल्या संघांनाही बक्षीस रक्कम मिळाली. पाचव्या आणि सहाव्या स्थानावर असलेल्या संघांना (अफगाणिस्तान आणि बांगलादेश) समान रक्कम $३,५०,००० (सुमारे ३.०४ कोटी रुपये) मिळाली. तर सातव्या आणि आठव्या क्रमांकाच्या संघांना (पाकिस्तान आणि इंग्लंड) समान रक्कम $१,४०,००० (सुमारे १.२२ कोटी रुपये) मिळाली.

२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. गट फेरीत सामना जिंकल्याबद्दल संघाला $३४००० (सुमारे २९.६१ लाख रुपये) मिळाले. याशिवाय, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आठही संघांना १,२५,००० डॉलर्स (सुमारे १.०८ कोटी रुपये) ची हमी रक्कम देण्यात आली आहे. आयसीसी या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण $६.९ दशलक्ष (सुमारे ६० कोटी रुपये) बक्षीस रकमेचे वितरण करत आहे. हे २०१७ पेक्षा ५३ टक्के जास्त आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता संघ होणार मालामाल!

चॅम्पियन्स ट्रॉफी बक्षीस रक्कम (अमेरिकी डॉलर्स)
विजेता संघ: $२.२४ दशलक्ष (१९.४८ कोटी रुपये)
उपविजेता: $१.२४ दशलक्ष (९.७४ कोटी रुपये)
उपांत्य फेरीतील खेळाडू (ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका): $५,६०,००० (४.८७ कोटी रुपये)
पाचव्या-सहाव्या क्रमांकाचा संघ (अफगाणिस्तान आणि बांगलादेश): $३,५०,००० (३.०४ कोटी रुपये)
७ व्या ते ८ व्या क्रमांकाचा संघ (पाकिस्तान आणि इंग्लंड): १,४०,००० डॉलर्स (१.२२ कोटी रुपये)
गट टप्प्यातील विजय: $३४,००० (रु. २९.६१ लाख)
हमी रक्कम: $१,२५,००० (रु. १.०८ कोटी)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -