न्यूझीलंडचे आघाडीचे तीन शिलेदार तंबूत

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या न्यूझीलंडचे आघाडीचे तीन शिलेदार ७५ धावांत तंबूत परतले. सलामीवीर वील यंग २३ चेंडूत १५ धावा करुन वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर पायचीत झाला. नंतर रचिन रवींद्र २९ चेंडूत ३७ धावा करुन कुलदीप यादवच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. तर केन विल्यमसन १४ चेंडूत ११ धावा केल्यानंतर कुलदीप यादवच्या चेंडूवर त्याच्याकडेच झेल देऊन परतला. आता डॅरिल मिशेल आणि टॉम लॅथम हे दोघे खेळत आहेत. न्यूझीलंडचा पहिला बळी ५७ धावांवर गेला. तर दुसरा बळी ६९ धावांनंतर आणि तिसरा बळी ७५ धावा झाल्यानंतर गेला. भारताकडून कुलदीप यादवने दोन आणि वरुण चक्रवर्तीने एक बळी घेतला.



भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.


 
न्यूझीलंड संघ : विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), काइल जेमिसन, विल्यम ओरोर्क, नॅथन स्मिथ.

 





यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीत अ आणि ब असे दोन गट होते. प्रत्येक गटात चार संघ होते. यामुळे प्रत्येक संघाला गटातील इतर तीन संघांसोबत एक – एक सामना खेळायचा होता. या नियोजनानुसार चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये प्रत्येक संघ तीन साखळी सामने खेळणार होता. यानंतर उपांत्य फेरीत अ गटातील पहिल्या क्रमांकाचा संघ विरुद्ध ब गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ आणि दुसऱ्या उपांत्य सामन्यात अ गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ विरुद्ध ब गटातील पहिल्या क्रमांकाचा संघ अशी प्रत्येकी एक लढत झाली. अ गटातून अनुक्रमे भारत आणि न्यूझीलंड आणि ब गटातून अनुक्रमे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन आणि न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला.

भारताने यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील आतापर्यंत झालेले सर्व चार सामने जिंकले. तर न्यूझीलंडने साखळी फेरीतला भारताविरुद्धचा सामना वगळता इतर तीन सामने जिंकले. आता अंतिम फेरीच्या निमित्ताने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये दुसऱ्यांदा भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने असतील. हा सामना जिंकणारा संघ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकणार आहे.

याआधी चॅम्पियन्स ट्रॉफी २००० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमनसामने होते. या सामन्यात भारताला हरवून न्यूझीलंडने बाजी मारली होती. भारताने प्रथम फलंदाजी करुन २६४ धावा केल्या होत्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडने सामना दोन चेंडू आणि चार गडी राखून जिंकला होता. या अंतिम सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्याची सुवर्णसंधी भारताला रविवार ९ मार्च २०२५ रोजी मिळणार आहे. यामुळे अंतिम सामन्यात भारत कसा खेळतो याकडे अनेक भारतीय क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.

सामना कुठे बघता येणार ?

टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि स्पोर्ट्स १८ नेटवर्कच्या क्रीडा वाहिन्यांवर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण रविवार ९ मार्च २०२५ रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजल्यापासून सुरू होणार आहे. तसेच जिओ हॉटस्टार या अॅपवर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग रविवार ९ मार्च २०२५ रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजल्यापासून सुरू होणार आहे.

Comments
Add Comment

FIFA World Cup 2026 : एम्बाप्पेची ऐतिहासिक कामगिरी; गोल्डन बूटच्या शर्यतीत मेस्सीला टाकले मागे

मियामी : फिफा विश्वचषक २०२६ मधील तिसऱ्या क्रमांकासाठीच्या सामन्यात इंग्लंडने ६-४ ने फ्रान्सवर दणदणीत विजय

Commonwealth Games 2026 : मीराबाई चानू भारताची ध्वजवाहक

नवी दिल्ली :ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू आणि लव्हलिना बोरगोहेन यांची ग्लासगो येथे होणाऱ्या राष्ट्रकुल

FIFA FINAL | मुंबईतील फुटबॉल चाहत्यांचा निकाल! अर्जेंटिना की स्पेन? कोण उचलणार विश्वचषक?

मुंबई : एका ऐतिहासिक महामुकाबल्यासाठी संपूर्ण जग सज्ज झाले आहे. मेटलाइफ स्टेडियममध्ये होणारा फिफा विश्वचषक २०२६

Lionel Messi on Lamine Yamal : यामालसोबतच्या व्हायरल फोटोवर मेस्सीची पहिली प्रतिक्रिया,"आता आम्ही एकमेकांचा…"

न्यू यॉर्क : फिफा विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना अर्जेंटिना विरुद्ध स्पेन यांच्यात खेळला जाणार आहे. मेस्सीच्या

Most goalscorer : जगातील सर्वाधिक गोल करणारे 5 फुटबॉलपटू

फुटबॉलच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणाऱ्या जगातील

Krishnamachari Srikkanth : ईशान ऐवजी राहुलला चौथ्या स्थानावर का खेळवत नाही ? श्रीकांत यांचा भारतीय संघाला थेट सवाल

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या फलंदाजीच्या क्रमावरून