नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा फलंदाजीचा निर्णय

Share

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे सुरू आहे. भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळत असलेला भारतीय संघ सलग १५ व्यांदा नाणेफेक हरला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून अंतिम सामन्यात फलंदाजीचा निर्णय घेतला.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.

न्यूझीलंड संघ : विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), काइल जेमिसन, विल्यम ओरोर्क, नॅथन स्मिथ.

यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीत अ आणि ब असे दोन गट होते. प्रत्येक गटात चार संघ होते. यामुळे प्रत्येक संघाला गटातील इतर तीन संघांसोबत एक – एक सामना खेळायचा होता. या नियोजनानुसार चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये प्रत्येक संघ तीन साखळी सामने खेळणार होता. यानंतर उपांत्य फेरीत अ गटातील पहिल्या क्रमांकाचा संघ विरुद्ध ब गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ आणि दुसऱ्या उपांत्य सामन्यात अ गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ विरुद्ध ब गटातील पहिल्या क्रमांकाचा संघ अशी प्रत्येकी एक लढत झाली. अ गटातून अनुक्रमे भारत आणि न्यूझीलंड आणि ब गटातून अनुक्रमे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन आणि न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला.

भारताने यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील आतापर्यंत झालेले सर्व चार सामने जिंकले. तर न्यूझीलंडने साखळी फेरीतला भारताविरुद्धचा सामना वगळता इतर तीन सामने जिंकले. आता अंतिम फेरीच्या निमित्ताने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये दुसऱ्यांदा भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने असतील. हा सामना जिंकणारा संघ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकणार आहे.

याआधी चॅम्पियन्स ट्रॉफी २००० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमनसामने होते. या सामन्यात भारताला हरवून न्यूझीलंडने बाजी मारली होती. भारताने प्रथम फलंदाजी करुन २६४ धावा केल्या होत्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडने सामना दोन चेंडू आणि चार गडी राखून जिंकला होता. या अंतिम सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्याची सुवर्णसंधी भारताला रविवार ९ मार्च २०२५ रोजी मिळणार आहे. यामुळे अंतिम सामन्यात भारत कसा खेळतो याकडे अनेक भारतीय क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.

सामना कुठे बघता येणार ?

टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि स्पोर्ट्स १८ नेटवर्कच्या क्रीडा वाहिन्यांवर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण रविवार ९ मार्च २०२५ रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजल्यापासून सुरू होणार आहे. तसेच जिओ हॉटस्टार या अॅपवर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग रविवार ९ मार्च २०२५ रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजल्यापासून सुरू होणार आहे.

Recent Posts

अनधिकृत इमारतींची संख्या ही ११० ने वाढली

पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…

13 minutes ago

जलवाहिनी फुटल्याने २४ तास ‘पाणीबाणीचे’ मुंबईकरांसमोर संकट

काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…

51 minutes ago

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…

2 hours ago

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

4 hours ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

4 hours ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

4 hours ago