मुंबईतील मरोळमध्ये वाहनांना आग, तीन गंभीर जखमी

  116

मुंबई : मुंबईतील मरोळ परिसरात गॅस पाईपलाईन गळतीमुळे आग लागली. ही आग लागल्यामुळे जवळच उभी असलेली वाहने जळून खाक झाली. यात एक कार, एक रिक्षा आणि एक दुचाकी यांचा समावेश आहे. दुर्घटनेत तीन नागरिक भाजले आहेत. भाजलेल्या तीन जणांवर रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. भाजलेल्यांमध्ये दोन २० ते २२ वयोगटातील तरुण आहेत आणि एक ५२ वर्षांचा रिक्षाचालक आहे. सर्वांची ओळख पटवण्यात आली आहे. संबंधितांच्या नातलगांना माहिती देण्यात आली आहे.





गॅस गळतीमुळे रविवारी ९ मार्च २०२५ रोजी मध्यरात्री आग लागली. ही आग अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने कारवाई करुन नियंत्रणात आणली आहे. यामुळे पुढील संकट टळले आहे. पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.



दुर्घटना घडली त्यावेळी परिसरात जास्त वर्दळ नव्हती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

अरविंदकुमार कैथल - वय २१ - दुचाकीवर - ३० ते ४० टक्के भाजले
अमन हरिशंकर सरोज - वय २२ - दुचाकीवर - ४० ते ५० टक्के भाजले
सुरेश कैलास गुप्ता - वय ५२ - रिक्षा चालक - कंबरेखाली २० टक्के भाजले
Comments
Add Comment

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई

शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) :

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ