मुंबई : मुंबईतील मरोळ परिसरात गॅस पाईपलाईन गळतीमुळे आग लागली. ही आग लागल्यामुळे जवळच उभी असलेली वाहने जळून खाक झाली. यात एक कार, एक रिक्षा आणि एक दुचाकी यांचा समावेश आहे. दुर्घटनेत तीन नागरिक भाजले आहेत. भाजलेल्या तीन जणांवर रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. भाजलेल्यांमध्ये दोन २० ते २२ वयोगटातील तरुण आहेत आणि एक ५२ वर्षांचा रिक्षाचालक आहे. सर्वांची ओळख पटवण्यात आली आहे. संबंधितांच्या नातलगांना माहिती देण्यात आली आहे.
गॅस गळतीमुळे रविवारी ९ मार्च २०२५ रोजी मध्यरात्री आग लागली. ही आग अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने कारवाई करुन नियंत्रणात आणली आहे. यामुळे पुढील संकट टळले आहे. पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
दुर्घटना घडली त्यावेळी परिसरात जास्त वर्दळ नव्हती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
अरविंदकुमार कैथल – वय २१ – दुचाकीवर – ३० ते ४० टक्के भाजले
अमन हरिशंकर सरोज – वय २२ – दुचाकीवर – ४० ते ५० टक्के भाजले
सुरेश कैलास गुप्ता – वय ५२ – रिक्षा चालक – कंबरेखाली २० टक्के भाजले