Nana Patekar : नाना पाटेकर यांना 'मी टू' प्रकरणी मोठा दिलासा

  46

मुंबई  : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांना 'मी टू' प्रकरणी कोर्टाकडून अखेर दिलासा मिळाला आहे. अभिनेत्रीवरील लैंगिक छळाच्या आरोपाखाली पाटेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु पुरेशा पुराव्याअभावी नाना पाटेकर दोषी ठरण्यापासून वाचले आहेत. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने पाटेकरांविरोधात तक्रार दाखल केली होती. तर तिने त्यांच्यावर गंभीर आरोप करत अंधेरी कोर्टात याचिकाही दाखल केली होती. परंतु कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर एका फिल्मच्या शुटिंगदरम्यान लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप लावला होता. याप्रकरणी तिने नाना पाटकरांसह इतरांविरोधात अंधेरी दंडाधिकारी कोर्टात विनयभंग आणि धमकीची तक्रार दाखल केली होती आणि याचिकाही दाखल केली. यावर न्याय दंडाधिकारी निलेश बन्सल यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत अॅड. अनिकेत निकम यांनी पाटेकरांची बाजू मांडली. तसेच पुरेशा पुराव्यांअभावी न्यायालयाने तनुश्रीने दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. तर मुंबई पोलिसांनी सादर केलेला क्लोजर रिपोर्ट देखील फेटाळल्याने पाटेकरांना दिलासा मिळाला आहे.



अभिनेत्री तनुश्री दत्ताने २००८ मध्ये एका सिनेमाच्या शुटिंगदरम्यान डान्स सिक्वेन्सवेळी लैंगिक छळ झाल्याचा आरोप केला. या आरोपाखाली तिने नाना पाटेकर, कोरिओग्राफर गणेश आचार्य, दिग्दर्शक अब्दुल सामी सिद्दीकी आणि निर्माता राकेश सारंग यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. तिने ओशिवरा पोलीस ठाण्यात या चौघांविरोधात एफआयआर दाखल केली. याचआधारे पोलिसांनी पाटेकरांवर मी टू मोहिमेच्या अंतर्गत गुन्हा देखील दाखल केला. तनुश्री दत्ताने मी टू मोहिमेचा मुद्दा गिरवत पाटेकरांवर लैंगिक छळाचा गंभीर आरोप केला होता. तिने असा दावा केला होता की, २००८ मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ या फिल्मच्या शुटिंगदरम्यान नाना पाटेकरांनी तिचा लैंगिक छळ केला. तर सिंगर आणि अॅक्टरची शुटिंग चालू असण्याच्या दरम्यान देखील त्यांनी वारंवार सेटवर येत होते. मात्र कोर्टाने हे आरोप फेटाळून लावत पाटेकरांना दिलासा दिला आहे. परंतु तनुश्रीच्या वकिलांनी हे नाकारले आहे. ते म्हणाले की, बी रिपोर्ट न्यायालयाने फेटाळला आहे. अभिनेत्रीने केवळ नाना पाटेकरच नाही तर कोरिओग्राफर गणेश आचार्य, दिग्दर्शक अब्दुल सामी सिद्दीकी आणि निर्माता राकेश सारंग यांच्यावरही आरोप केले होते.

Comments
Add Comment

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई

शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) :

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९