Tuesday, March 18, 2025
Homeताज्या घडामोडीNana Patekar : नाना पाटेकर यांना 'मी टू' प्रकरणी मोठा दिलासा

Nana Patekar : नाना पाटेकर यांना ‘मी टू’ प्रकरणी मोठा दिलासा

मुंबई  : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांना ‘मी टू’ प्रकरणी कोर्टाकडून अखेर दिलासा मिळाला आहे. अभिनेत्रीवरील लैंगिक छळाच्या आरोपाखाली पाटेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु पुरेशा पुराव्याअभावी नाना पाटेकर दोषी ठरण्यापासून वाचले आहेत. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने पाटेकरांविरोधात तक्रार दाखल केली होती. तर तिने त्यांच्यावर गंभीर आरोप करत अंधेरी कोर्टात याचिकाही दाखल केली होती. परंतु कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर एका फिल्मच्या शुटिंगदरम्यान लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप लावला होता. याप्रकरणी तिने नाना पाटकरांसह इतरांविरोधात अंधेरी दंडाधिकारी कोर्टात विनयभंग आणि धमकीची तक्रार दाखल केली होती आणि याचिकाही दाखल केली. यावर न्याय दंडाधिकारी निलेश बन्सल यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत अॅड. अनिकेत निकम यांनी पाटेकरांची बाजू मांडली. तसेच पुरेशा पुराव्यांअभावी न्यायालयाने तनुश्रीने दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. तर मुंबई पोलिसांनी सादर केलेला क्लोजर रिपोर्ट देखील फेटाळल्याने पाटेकरांना दिलासा मिळाला आहे.

Mumbai Update : मुंबईत आज उष्णतेच्या लाटेचा इशारा

अभिनेत्री तनुश्री दत्ताने २००८ मध्ये एका सिनेमाच्या शुटिंगदरम्यान डान्स सिक्वेन्सवेळी लैंगिक छळ झाल्याचा आरोप केला. या आरोपाखाली तिने नाना पाटेकर, कोरिओग्राफर गणेश आचार्य, दिग्दर्शक अब्दुल सामी सिद्दीकी आणि निर्माता राकेश सारंग यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. तिने ओशिवरा पोलीस ठाण्यात या चौघांविरोधात एफआयआर दाखल केली. याचआधारे पोलिसांनी पाटेकरांवर मी टू मोहिमेच्या अंतर्गत गुन्हा देखील दाखल केला. तनुश्री दत्ताने मी टू मोहिमेचा मुद्दा गिरवत पाटेकरांवर लैंगिक छळाचा गंभीर आरोप केला होता. तिने असा दावा केला होता की, २००८ मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ या फिल्मच्या शुटिंगदरम्यान नाना पाटेकरांनी तिचा लैंगिक छळ केला. तर सिंगर आणि अॅक्टरची शुटिंग चालू असण्याच्या दरम्यान देखील त्यांनी वारंवार सेटवर येत होते. मात्र कोर्टाने हे आरोप फेटाळून लावत पाटेकरांना दिलासा दिला आहे. परंतु तनुश्रीच्या वकिलांनी हे नाकारले आहे. ते म्हणाले की, बी रिपोर्ट न्यायालयाने फेटाळला आहे. अभिनेत्रीने केवळ नाना पाटेकरच नाही तर कोरिओग्राफर गणेश आचार्य, दिग्दर्शक अब्दुल सामी सिद्दीकी आणि निर्माता राकेश सारंग यांच्यावरही आरोप केले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -