Pune Viral Video : पुण्यात चाललंय काय! आलिशान गाडी रस्त्यात थांबवून तरूणाचा गलिच्छ प्रकार

पुणे : सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचे माहेरघर मानले जाणाऱ्या पुणे शहरात (Pune News) एका मद्यधुंद अवस्थेतील तरुणाने भर चौकात चारचाकी गाडी थांबवून गलिच्छ कृत्य केल्याचे समोर आले आहे. मद्यधुंद अवस्थेमध्ये तरुणांनी अश्लील चाळे करत लघुशंका केली आहे. दरम्यान या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ व्हायरल (Pune Viral Video) झाला असून या घटनेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील शास्त्रीनगर चौकात (पुणे नगर रोड) ही घटना घडली. मद्यधुंद अवस्थेमध्ये रस्त्याच्या मधोमध चारचारी गाडी उभी करून दारूच्या नशेत तरूणांनी बाहेर येत रस्त्यावर लघुशंका केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये सिग्नलवर निळ्या रंगाची एक आलिशान बीएमडब्लू गाडी उभी असल्याचे दिसते. तर गाडीच्या शेजारीच तरुण लघुशंका करत आहे. व्हिडीओ काढणाऱ्यांनी जेव्हा तरुणाला याबाबत जाब विचारला तेव्हा सदर तरुणाने अश्लिल हावभाव करून दाखवले. तसेच यावेळी गाडीत आणखी एक तरुण बसलेला दिसत आहे. ज्याच्या हातात दारूची बाटली दिसत असून तो व्हिडीओ काढा असे सांगत आहे. (Pune Viral Video)



दरम्यान, या प्रकरणाबाबत संबंधित तरुणावर गुन्हा दाखल केला असून आरोपी तरुणाचा शोध सुरु करण्यात आला आहे.  मात्र पुणे शहरात सतत घडणाऱ्या या घटनांमुळे पुणे प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Comments
Add Comment

Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

नाशिकमध्ये गाजत असलेल्या महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस

अमरावती होणार उद्योगांचे नवे केंद्र! ५९० रुपयांत मिळणार जमीन

मुंबई : अमरावतीत अधिकाधिक उद्योग आणण्यासाठी शासन कटिबद्ध असून, त्यासाठी अमरावतीत संबंधित अधिकाऱ्यांच्या समवेत

पुणे - पंचवीस जणांना मिळणार युरोपियन स्पेस सेंटरला भेट देण्याची संधी

पुणे : इस्रो आणि नासा भेटीचा उपक्रम यशस्वी ठरल्यानंतर जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आता आणखी मोठी झेप घेणार आहेत.

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पूजांची २५ मार्चपासून ऑनलाईन नोंदणी

सोलापूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा व

Ashok Kharat case : पीडितांच्या आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यास होणार गुन्हा दाखल

मुंबई : अशोक खरात प्रकरणानंतर सोशल मीडियावर पीडित महिलांबाबत आक्षेपार्ह मजकूर, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल

खरातच्या काळ्या कारनाम्याचा छडा आयपीएस तेजस्वी सातपुते लावणार, कोण आहेत आयपीएस तेजस्वी सातपुते?

नाशिक: महाराष्ट्रातील भोंदूबाबा म्हणजेच अशोक खरातचं काळं सत्य आता हळूहळू समोर येत आहे. स्वत:ला कॅप्टन आणि