Saturday, March 15, 2025
Home'ती'ची गोष्टSocial Worker Women : वसा आनंद फुलवण्याचा! - रश्मी भातखळकर

Social Worker Women : वसा आनंद फुलवण्याचा! – रश्मी भातखळकर

मुंबई (वैष्णवी भोगले) : बुद्धिमत्ता, विचारशक्ती, भावना या मनुष्याला मिळालेल्या देणग्या आहेत. त्यांचा वापर त्याने योग्य तऱ्हेने, योग्यवेळी, योग्य ठिकाणी करणे अपेक्षित आहे. ‘केलेलं काम, दिलेलं दान या हाताचं त्या हाताला कळू नये अशी भावना मनात सतत जागी राहावी, ‘नेकी कर कुएमें डाल’ अशी मनाची अवस्था असावी. शेवटी, ‘हेरूनी सत्पात्र, दीनदुबळे जन। त्यास्तव वेचिल जो तनमनधन। तोचि दाता ओळखावा। भाव तेथेचि जाणावा! याचाच आढावा आपण या लेखातून घेणार आहोत.

पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातून रश्मी भातखळकर यांनी आपलं शिक्षण पूर्ण केले. ८ वी ते १० वी टेक्निकल विषय शिकवला जायचा. मुख्याध्यापकांचा विशेष कौतुक करावसं वाटतं त्यांनी नेहमी आम्हाला मार्गदर्शन केले. ६० मुलींपैकी ३ मुलींना टेक्निकल विषयासाठी निवडण्यात आले. त्यात रश्मी भातखळकर यांचेही नाव होते. या शिक्षणातून आठवी ते दहावीपर्यंत खूप काही शिकायला मिळालं होतं. वडील त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक असल्यामुळे घरामध्ये सांघिक वातावरण होते. लहानपणापासून टेक्निकल शिक्षण तसेच आरएसएस शाखांमधून सामाजिक कार्य तसेच जबाबदार नागरिक बनण्याकरिता जे काही लागतं ते खेडेगावात राहून वडिलांनी शिक्षणाचा पाया मजबूत बनविला होता. माझ्या सर्व यशात वडिलांचा खूप मोठा हातभार आहे. बीकॉमचे शिक्षण सुरु असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये काम करायला सुरुवात केली. ही संघटना शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी पण राष्ट्रीय भावनेने प्रेरित, तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये लागणारे मनुष्यबळ संघटित करणारी फार मोठी संघटना आहे. या परिषदेतून समाजाभिमुख प्रवास चालू चालू होता. अंतर राज्य छात्र जीवन दर्शन याअंतर्गत पूर्वांचलमध्ये जावून समाज, संस्कृती, परिस्थिती अभ्यास केला. रश्मी भातखळकर यांना या उपक्रमाअंतर्गत मणिपूरला पाठवण्यात आले. तिथेही खूप काही गोष्टी शिकण्यास मिळाल्या. हे उपक्रम घेण्यामागचा उद्देश म्हणजे तरुण पिढीमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता वाढवणे होय. आजही ही संघटना कार्यरत आहे.

Home Decor Entrepreneur : गृह सजावटीला पूर्णत्व देणारी उद्योजिका – विनीता पेडणेकर

काश्मीरच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले तेव्हा आझाद काश्मीरचा झेंडा लाल चौकात फडकत होता. त्याठिकाणी भारताचा झेंडा फडकला पाहिजे यासाठी त्यांनी आंदोलन केले. या आंदोलनामध्ये हजारोहून अधिक कार्यकर्त्यांनी उपस्थिती दाखवली होती. या संस्थेतून मिळणाऱ्या विविध समाजपयोगी कार्यक्रमांमधून नवनवीन गोष्टी शिकायला मिळत होत्या. रग्गड पैसा खर्च करून आपण एखादा कोर्स करतो पण त्याही पेक्षा कैकपटीने जास्त चांगला रिझल्ट हा सामाजिक कार्यातून मिळत असतो. या नवनव्या उपक्रमांतून आपणही समाजाचे एक भाग आहोत, आपणही काहीतरी केले पाहिजे अशी लहानपणापासून इच्छा असल्याने वडिलांकडून मिळालेले संघाचे बाळकडू, घरातील वातावरण, कुटुंब, तसेच अतुल भातखळकर आणि माझे जुळणारे समलिंगी पूरक असणारे विचार यांनी मला नेहमी माझ्या यशात साथ दिली. विद्यार्थी परिषदेमध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम घेऊन तरुण मुला-मुलींमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे, राष्ट्रीय भावना जागृत करणे, चांगला नागरिक घडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. रश्मी भातखळकर यांनी दोन वर्षे ठाणे, नंदूबार येथे तरुणांना विविध उपक्रमांद्वारे प्रोत्साहित केले.

रश्मी भातखळकर या १५ वर्षांपासून ‘केशवसृष्टी’मध्ये कार्यरत आहेत. केशवसृष्टी ही खूप मोठी संस्था असून रश्मी भातखळकर केशवसृष्टीच्या विश्वस्त आहेत. केशवसृष्टी पुरस्कार ११ जणांच्या टीममार्फत निवड करुन दिला जातो. सामाजिक पुरस्कार देताना विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संघटनांना हा पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत या उपक्रमातून १५ पुरस्कार देण्यात आले. या पुरस्कारांच्या निमित्ताने १०० पेक्षा जास्त संस्थांना भेटी देण्यात आल्या. महिलांनीही घरापुरते मर्यादित न राहता बाहेर पडणे गरजेचे आहे. आपली दृष्टी जेव्हा सुदृढ, व्यापक दृष्टी होईल, आपण इतरांकरिता जेव्हा काम करायला लागतो तेव्हा एक वेगळाच आनंद आपल्याला मिळत असतो. तसेच मुलांची मानसिक ठेवण, समाजाकरिता चांगला नागरिक बनविण्यासाठी, सुदृढ पिढी घडविण्यासाठी तरुण पिढीला प्रेरित करणे गरजेचे आहे. आपले घर, कुटुंब, व्यवसाय करत असताना आपण समजाची पण जबाबदारी सांभाळली पाहिजे. जीवन की तयारी में सारा जीवन बीत गया… आपण आपल्याच विश्वात न गुंतून जाता बराच वेळ मोकळा असतो. तो इतरांसाठी सकारात्मक कसा बनवता येईल याचा विचार केला तर अनेकांच्या आयुष्यात आनंदाची लकेर उजळेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -