मुंबई (नेत्रा नलावडे) : ‘नंदिनी आवाडे’ या महिलांसाठी खरोखरच एक ‘लेडी बॉस’ ठरल्या अाहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिवपदी नंदिनी आवाडे यांची नियुक्ती मुंबई येथे करण्यात आली. जागतिक महिला दिनानिमित्त नंदिनी आवाडे यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी त्यांचे अनुभव आणि त्यांचा प्रवास यांच्याबद्दल आम्हाला सांगितले. नंदिनी आवाडे या एक खुल्या विचारांची, ‘स्त्री’. आयुष्यात पुढे काय करायचे हे काही ठरले नसताना, लग्नानंतर नोकरी करायची नाही असे ठरवलेल्या नंदिनी आवाडे यांच्या कुटुंबाची जबाबदारी वाढली. कुटुबांला आर्थिक हातभार लागावा म्हणून अचानक झालेला हा प्रवास त्यांच्यासाठी एक आवाहनच होते. मोठ्या शहारामध्ये शिक्षण घेतलेल्या नंदिनी आवाडे यांना वाचन, लेखन समजणारी स्किल होतीच, पण शिवणकाम, विणकाम किंवा व्यवसाय करण्याचा अनुभव नव्हता. नंदिनी आवाडे यांनी शासनाची परीक्षा देण्याचे ठरवले तेव्हा त्यांना कुंटुब आणि परीक्षा या दोन्ही बाजू सांभाळाव्या लागल्या. अर्थविश्वाचा अभ्यास आणि इतर गोष्टींमुळे त्यांनी आपला ठसा या क्षेत्रात सहजासहजी उमटवला. या क्षेत्राला त्यांचा प्रवास सुरू झाला तो १९९८ साली. पहिली महिला अधिकाऱ्यांची बॅच सुरू झाली ती १९९८ साली. लोकांना कुतूहल होते की, एक स्त्री या क्षेत्रात काम करू शकेल का?
ती ितची जबाबदारी पार पाडू शकेल का? शंकेच्या नजरेने त्यावेळेस महिला अधिकाऱ्यांकडे पाहिलं जात असे, पण जेव्हा लोकांना हे पटलं की स्त्रीसुद्धा पुरुषांइतकीच आपल्या क्षेत्रात, कार्यात कामात यशस्वीरित्या पार पाडतेय तेव्हा त्यांचा स्त्रीयांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. भारतीय लोकं ही जुन्या विचारांची, जुन्या पिढीची अाहेत. जुन्या गोष्टी सोडत नाहीत आणि नवीन गोष्टी स्वीकारत नाहीत आणि स्वीकारल्या तरी शंभर टक्के त्यावर विश्वास ठेवत नाहीत. उदा. आधार कार्ड, पॅनकार्ड, रेशन कार्ड याला आपला मो. नं. लिंक करणे. जुन्या लोकांना, यावर विश्वासच बसत नव्हता, तसेच कोविड काळात वॅक्सिनेशन योग्य की अयोग्य यांची सांगड घालणं त्यांना जमत नव्हते आणि याच गोष्टी शासनातर्फे समाजापर्यंत कशाप्रकारे पोहोचवता येतील हे एक आवाहन त्यांच्यासमोर असायचे. त्यातूनच ते काम त्यांनी अचूकपणे पार पाडले. आज महिला दिनानिमत्ति त्यांनी महिलांना असे सांगितले की, महिलांनी स्वावलंबी बनायला हवे आहे. आपले कल्चर, आपल्या परंपरा जोपसल्या पाहिजेत त्या आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवता आल्या पाहिजेत.
आपल्या मुलांना कशाप्रकारे हाताळले पाहिजे. महाराष्ट्र सोडला, तर बाकीच्या ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती कशाप्रकारे जोपासली आहे यावर लक्ष दिले पाहिजे, तसेच मुलांना योग्य विचारांची सांगड घालून दिली पाहिजे. जेणेकरून एकत्र कुटुंब काय आहे हे त्यांना समजेल, तसेच त्यांच्या क्षेत्रातील गोष्टी सांगायला गेल्या, तर जेव्हा शासन एखादी योजना तयार करते ती लोकसंख्येचा विचार करून केली जात नाही. त्या योजनेचा बजेट तयार केला जातो. त्या बजेटमध्ये किती लोक बसतील याची मर्यादा ठरते. उदा. रोजगार हमी योजना अजूनही ही योजना चालू आहे, तसेच या रोजगार हमी योजनेत जनगणनेनुसार संख्येत वाढ होत राहते.
जेव्हा योजना तयार केल्या जातात तेव्हा शासकीय अधिकाऱ्यांकडे अशी जबाबदारी येते की, ती योजना लोकांपर्यंत कशी पोहचवावी, पण वाढती लोकसंख्या लक्षात घेता या योजना सहसा लाेकांपर्यंत पोहचण्यास उशीर होतो, तर काही योजना उशिरा का होईना त्या योजनांचा लाभ समाजाला घेता येतो. त्यांच्या अनुभवातून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे शासकीय सेवेत मर्यादीत गोष्टी स्वीकारून काम करावे लागते. जबाबदारी जास्त असते. स्त्रीने स्वतःवर विश्वास ठेऊन आपल्या कामांत, क्षेत्रांत यश संपादन केले. म्हणूनच ती एक आई, एक मुलगी, एक सून, एक बायको, एक सासू आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती एक ‘स्वावलंबी स्त्री’ म्हणून जन्माला आली.