सिंधुदुर्ग : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उबाठा शिवसेनेनंतर (UBT) आता शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी श. प. गटाचे ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सिद्धेश तेंडूलकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये पक्षप्रवेश केला.
सावंतवाडी तालुक्यात शरद पवार राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे. ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सिद्धेश तेंडूलकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे. सिद्धेश तेंडूलकर यांच्यासह प्रिया गावडे, मानसी निवजेकर, संतोष आसयेकर, भालचंद्र सावंत, प्रशांत मेस्त्री, महेश गवंडे कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
मंत्री नितेश राणे सिंधुदुर्गचे पालकमंत्री झाल्यापासून जिल्ह्याच्या विकासाला वेग आला आहे. सर्व समाजघटक आणि सिंधुदुर्गातील जनता त्यांच्या कार्यावर समाधान व्यक्त करत आहे. आमच्या भागाचा विकास नितेश राणे यांच्या नेतृत्वाखालीच होऊ शकतो यामुळेच आम्ही सर्वजण त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत प्रवेश करीत आहोत, असा विश्वास पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, सावंतवाडी तालुका आंबोली मंडल अध्यक्ष रविंद्र मडगावकर, सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे, जिल्हा कार्यकारणी सदस्य चंद्रकांत जाधव, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, मळगावचे माजी सरपंच गणेश प्रसाद पेडणेकर यांसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…
निरोगी त्वचा असणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र, निरोगी आणि सुंदर दिसणाऱ्या त्वचेची योग्य काळजी…
पुणे : चितळे प्रकरण ताजे असतानाच पुण्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या नावे बनावट कपडे विकल्याची माहिती समोर…
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी (Bell's palsy) हा आजार झाला…