Thursday, May 22, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Pune News : तो सिग्नलवर नाही माझ्या तोंडावर 'मुतला'

Pune News : तो सिग्नलवर नाही माझ्या तोंडावर 'मुतला'

मुलाच्या लाजिरवाण्या कृत्यानंतर वडिलांना पश्चाताप


पुणे : पुणे शहरातील शास्त्रीनगर या गजबजलेल्या परिसरात मद्यधुंद अवस्थेमध्ये रस्त्याच्या मधोमध आपली बीएमडब्ल्यू कार उभी करून एका तरूणाने अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना घडली. त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर त्या मुलाच्या वडिलांनी दु:खद आणि संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे.


या मद्यधुंद तरुणाने अश्लील चाळे करत, सिग्नलवर रस्त्याच्या मध्यभागी कार उभी करून, बाहेर येत रस्त्यावर लघुशंका केल्याची घटना समोर आली. त्यानंतर एका व्यक्तीने त्या तरूणाला जाब विचारल्यानंतर त्याने पुन्हा एकदा अश्लील चाळे केले आणि भरधाव वेगात आपली कार पळवली. ही संतापजनक घटना समोर आल्यानंतर आपल्या मुलाच्या या संतापजनक कृत्याबाबत त्याच्या वडिलांकडून खंत व्यक्त केली आहे. मनोज रमेश अहुजा असे या मुलाच्या वडिलांचे नाव असून ते हॉटेल व्यावसायिक आहेत.



माझ्या मुलाने सिग्नलवर लघुशंका केली नसून तो माझ्या तोंडावर मुतला आहे. तो माझा मुलगा असल्याची मला लाज वाटते. पोलिसांनी मला शास्त्रीनगर पोलीस चौकीत बोलावले आहे. व्हिडिओमध्ये जी गाडी दिसत आहे ती माझ्या नावावर आहे. त्यामुळे चौकशीसाठी पोलिसांनी मला बोलावले आहे. माझ्या मुलाचे नाव गौरव मनोज अहुजा आहे. माझ्यावर जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे. मुलाचा मोबाईल सकाळपासून बंद आहे. आम्ही देखील त्याचा शोध घेत आहोत, असे म्हणत मुलाच्या वडिलांनी झालेल्या घटनेबद्दल खंत व्यक्त केली आहे.



या घटनेविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर पुणे पोलिसांकडून तरुणांचा शोध सुरू आहे. मद्यधुंद अवस्थेत त्याने केलेल्या विचित्र कृत्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तसेच त्याच्यासोबत असलेला त्याचा मित्रही मद्यधुंद अवस्थेत होता. या प्रकरणाबाबत संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. पुणे पोलिसांकडून त्या तरुणांचा शोध सुरु करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी या प्रकारणाला गांभीर्याने घेत कारवाईचे संकेत दिले आहेत.

Comments
Add Comment