पुणे : सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचे माहेरघर मानले जाणाऱ्या पुणे शहरात (Pune News) एका मद्यधुंद अवस्थेतील तरुणाने भर चौकात चारचाकी गाडी थांबवून गलिच्छ कृत्य केल्याचे समोर आले आहे. मद्यधुंद अवस्थेमध्ये तरुणांनी अश्लील चाळे करत लघुशंका केली आहे. दरम्यान या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ व्हायरल (Pune Viral Video) झाला असून या घटनेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
Maharashtra Weather : नागरिकांनो काळजी घ्या! राज्यभरात वाढणार उन्हाच्या झळा!
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील शास्त्रीनगर चौकात (पुणे नगर रोड) ही घटना घडली. मद्यधुंद अवस्थेमध्ये रस्त्याच्या मधोमध चारचारी गाडी उभी करून दारूच्या नशेत तरूणांनी बाहेर येत रस्त्यावर लघुशंका केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये सिग्नलवर निळ्या रंगाची एक आलिशान बीएमडब्लू गाडी उभी असल्याचे दिसते. तर गाडीच्या शेजारीच तरुण लघुशंका करत आहे. व्हिडीओ काढणाऱ्यांनी जेव्हा तरुणाला याबाबत जाब विचारला तेव्हा सदर तरुणाने अश्लिल हावभाव करून दाखवले. तसेच यावेळी गाडीत आणखी एक तरुण बसलेला दिसत आहे. ज्याच्या हातात दारूची बाटली दिसत असून तो व्हिडीओ काढा असे सांगत आहे. (Pune Viral Video)
दरम्यान, या प्रकरणाबाबत संबंधित तरुणावर गुन्हा दाखल केला असून आरोपी तरुणाचा शोध सुरु करण्यात आला आहे. मात्र पुणे शहरात सतत घडणाऱ्या या घटनांमुळे पुणे प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.