Thursday, March 27, 2025
Homeताज्या घडामोडीललित मोदींनी स्विकारले वानुआतु नावाच्या देशाचे नागरिकत्व

ललित मोदींनी स्विकारले वानुआतु नावाच्या देशाचे नागरिकत्व

नवी दिल्ली : आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी भारतीय नागरिकत्व सोडण्यासाठी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात अर्ज दिला आहे. त्यांनी आता वानुआतु नावाच्या देशाचे त्यांनी नागरिकत्व घेतले आहे. पाँडिचेरीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या या देशात कोणताही कर लावला जात नाही. १.३ कोटी रुपये खर्चून ललित मोदींनी या देशाचे नागरिकत्व घेतले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले , ललित मोदींनी उच्चायुक्तालयाला पासपोर्ट सरेंडर करण्यासाठी अर्ज केला आहेनुसार याची चौकशी होईल. त्यांच्याविरोधात सुरू असलेले खटले कायद्यानुसार सुरू राहतील. वानुआतु देशाची लोकसंख्या तीन लाख इतकी आहे. इथे गोल्डन पासपोर्टची योजना असते. श्रीमंत लोक पैसे देऊन इथले नागरिकत्व मिळवू शकतात. या पासपोर्टची किंमत १.३ कोटी रुपये आहे. यासाठी जास्त डॉक्युमेंटही लागत नाहीत. ऑनलाइन प्रक्रियेच्या माध्यमातून हे सबमिट केले जाऊ शकते. या प्रोसेसला एक महिन्यापेक्षाही कमी वेळ लागतो. तुम्ही या देशात पोहोचण्याआधी सगळी प्रक्रिया पूर्ण होते.

RO Water : आरओचे सांगून थेट विहिरीतील पाण्याची विक्री

वानुआतु देशाचे नागरिकत्व घेताच १२० देशात व्हिसा फ्री एन्ट्री मिळते. यात ब्रिटन आणि युरोपीय देशांचाही समावेश आहे. गेल्या दोन वर्षात ३० श्रीमंत भारतीयांनी इथले नागरिकत्व घेतले आहे. वानुआतु देश दक्षिण प्रशांत महासागरातील एक द्वीपराष्ट्र आहे. ज्वालामुखीतून तायर झालेल्या बेटांच्या समुहातील हा देश उत्तर ऑस्ट्रेलियापासून १७५० किमी अंतरावर आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -