विहिरीतील पाणी शुद्ध म्हणून पाणी पुरवठा केल्यानंतर एका लहान मुलाला ’जीबीएस’ची बाधा
पुण्यात आठ आरओ प्रकल्पांना पुन्हा ठोकले सील
२७ आरओ प्रकल्पांतून दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे आढळले
पुणे : सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरातील ८ आरओ प्रकल्पांना (RO Water) महापालिकेकडून पुन्हा सील ठोकण्याची कारवाई करण्यात आली. नियमभंग केल्याने ही कारवाई केली असल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.
दूषित पाणी पुरवठ्यामुळे पसरली ‘जीबीएस’ची साथ
महापालिकेत समाविष्ट धायरी, किरकटवाडी, नांदोशी, नर्हे, आंबेगाव या गावांमध्ये फेब्रुवारीत ‘जीबीएस’ची साथ पसरली होती. ही साथ दूषित पाणी पुरवठ्यामुळे पसरली असल्याचे तपासणीत आढळून आले होते.
Maharashtra Weather : नागरिकांनो काळजी घ्या! राज्यभरात वाढणार उन्हाच्या झळा!
३० मधील २७ प्रकल्पांतून दूषित पाणी पुरवठा
या भागातील आरओ प्रकल्पांच्या पाण्याची तपासणीत ३० मधील २७ प्रकल्पांतून दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे आढळून आल्याने पालिकेने या सर्व प्रकल्पांना सील ठोकले होते. त्यानंतर आरओ प्लॅन्टसाठी केलेल्या नियमावलीचे पालन न केल्याने त्या ८ प्रकल्पांना सील करण्यात आले आहेत.
विहिरीतील पाणी शुद्ध म्हणून पाणी पुरवठा केल्यानंतर एका लहान मुलाला ’जीबीएस’ची बाधा
एका आरओ प्रकल्प चालकाकडून थेट विहिरीतील पाणी शुद्ध म्हणून पाणी पुरवठा केल्यानंतर एका लहान मुलाला ’जीबीएस’ची बाधा झाली असून, त्याच्यावर ’व्हेटिलेंटर’वर उपचार सुरू आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेत केलेल्या पुनतर्पासणीदरम्यान ही कारवाई केली गेली.