Journalism Career : आव्हानात्मक करिअर - सोनल तुपे

मुंबई (अलिशा खेडेकर) : औद्योगिक क्रांतीमुळे जगाची झपाट्याने प्रगती झाली. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्रांतीने प्रगतीचा वेग एकदम वाढला. माहिती आणि माहितीचे विश्लेषण यांना प्रचंड महत्त्व आले. जग हातात सामावणाऱ्या मोबाईलमध्ये एकवटले. यामुळे पत्रकारिता, शिक्षण, मनोरंजन, दूरसंचार या सगळ्याचे स्वरुप बदलून गेले. या नव्या वातावरणात सतत परस्पर विरोधी माहितीचा मारा मोबाईलमधील वेगवेगळ्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरुन सुरू असतो. कोणती माहिती खरी आणि कोणती खोटी याची तपासणी करणे हेच मोठे आव्हान आहे. हेच आव्हान हाती घेऊन 'प्रेस इन्फर्मेशन ब्युरो' म्हणजेच पीआयबी या भारत सरकारच्या संस्थेत सोनल तुपे या कार्यरत आहेत. प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर प्रत्येक स्त्री आयुष्याचं गणित उत्तम पार पाडते. 'रांधा वाढा उष्टी काढा' या संकुचित वृत्तीमधून बाहेर पडत आजची स्त्री स्वतःला सिद्ध करत आली आहे. अनिष्ठ रूढींचा समाज, चुकीची वैचारिकता त्याचबरोबर स्त्रियांबद्दलचे चुकीचे समज या सगळ्याला सडेतोड उत्तर देत आशावाद आणि परिस्थितीशी झुंजण्याच्या अजोड बळाच्या जोरावर आजची स्त्री सर्वांना पुरून उरली.


लहानपणी प्रत्येकाचे मोठेपणी काहीतरी मोठं करण्याचे स्वप्न असते. सोनल तुपे यांनीही लहानपणी दूरदर्शनवर दिसणाऱ्या पत्रकारिता करणाऱ्या मॅडमसारखं होण्याचे स्वप्न पाहिले. मात्र पत्रकारितेत शिक्षण घेताना मुलगी आहे कशी वावरू? अनेक अडचणी असतील? या सगळ्या गोष्टींना चुकीचं ठरवत त्या आज स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. "दूरदर्शन वर दिसणाऱ्या मॅडम सारखं रूपाने आचरण घेण्याआधी त्यांच्यासारखी मोठी हो" हा सोनल तुपे यांच्या बाबांनी त्या इयत्ता ६वी मध्ये असताना कानमंत्र दिला. त्यानंतर मनाशी निश्चय करून त्यांनी कंबर कसून पत्रकारितेचा अभ्यास सुरु केला. त्यांचे २००४ साली पत्रकारितेत शिक्षण पूर्ण झाले. १४ एप्रिल २०१० साली बाबांचा आशीर्वाद घेऊन त्याचं दूरदर्शन वाहिनीवर वृत्तनिवेदिका म्हणून 'सोनल तुपे' हे नाव झळकलं. निश्चय आणि आव्हानांच्या बळावर दूरदर्शन ते आकाशवाणी येथे वार्ताहर वृत्त निवेदक पर्यंतचा टप्पा त्यांनी गाठला. वरिष्ठांनी दाखवलेला विश्वास त्यांनी आव्हान म्हणून पेलवलं. आणि वृत्त विभागाचे संपादक नितीन सप्रे यांच्यावतीने त्यावर्षीचं सोनल तुपे यांना दूरदर्शनच्या वतीने सर्वोत्कृष्ट वृत्तांकन म्हणून गौरविण्यात आलं होतं.



वरिष्ठांच्या शब्दांना सोनल तुपे यांनी कधीही न डावलता संधी म्हणून पाहिलं. आपण करत असलेलं काम हे काम नसून ती आपली सामाजिक आणि राष्ट्रीय जबाबदारी म्हणून पाहिलं. युक्रेन युद्धाच्या सुरुवातीस भारतात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती, त्यांच्या पालकांबरोबरच देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्यासाठी माहिती अधिकारी म्हणून कार्यरत असताना सोनल तुपे यांनी रात्रीचा दिवस केला. त्याचबरोबर यंदा १४४ वर्षांनंतर पार पडलेल्या कुंभमेळ्यासाठी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोमार्फत सोनल यांची नियुक्ती केली गेली होती यावेळेस सोनल यांच्यावर वरिष्ठांनी दाखवलेल्या विश्वासाला त्या पात्र ठरल्या. त्यांच्यासपेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठ्या असलेल्या पत्रकारांसोबत त्यांनी प्रयागराज येथे मीडिया टूर केली आणि महाराष्ट्रातल्या पत्रकारांना घेऊन त्यांनी हा दौरा केला. यामुळे वेळोवेळी सजग राहणं आणि हुशारीने परिस्थिती हाताळणं ही सोनल यांची कौशल्य या माध्यमातून उलगडली.


पत्रकारांना वेळेची परिसीमा नाही. शासकीय अधिकारी म्हणून काम करत असताना जबाबदार अधिकारी म्हणून वावरणं, एखाद्या नामांकित संस्थेच्या नावाला धक्का न लावता त्याला अजून योग्यरीत्या न्याय मिळवून देणं हे जोखमीचं काम आहे. वेळोवेळी घडलेल्या घटनांचा योग्य प्रसार करून सामान्य माणसांना जागरूक ठेवण्यामागे तसेच सकारात्मकतेने चांगल्या योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी जनता आणि शासनातील दुवा म्हणून सोनल तुपे महत्वाची कामगिरी बजावत आहेत.

Comments
Add Comment

मुंबईकरांचा प्रवास गारेगार , आजपासून २० वातानुकूलित बसमार्ग सुरू

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व

मुंबईत अर्धवट राहिलेल्या ४२५ रस्त्यांच्या कामांना सुरुवात, १५० कामे अद्याप थांबलेलीच

मुंंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिटच्या अर्धवट कामांना आता

मुुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर धारावी प्रकल्पाचे होणार कास्टींग यार्ड?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची विल्हेवाट लावून जमिन पुनर्प्राप्त करून देण्याच्या

Rain Update : 'मोंथा' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, 'मोंथा' (Montha)

दिवाळी हंगामात लालपरीची ३०१ कोटींची कमाई

चांगले उत्पन्न आणल्याबद्दल मंत्री प्रताप सरनाईक यांच्यांकडून कर्मचाऱ्यांचे कौतुक मुंबई

मोनोरेल, मेट्रो सेवांसाठीचा आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा...

जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्षांच्या दिल्या अशा सूचना मुंबई (खास प्रतिनिधी) : सार्वजनिक वाहतूक