Actress Madhura Welankar : स्त्रीने स्त्रीचा सन्मान करणे महत्त्वाचे...- अभिनेत्री मधुरा वेलणकर

  61

मुंबई (तेजल नेने-मोरजकर) : दैनिक प्रहार आयोजित कार्यक्रमात आपण प्रामुख्याने वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला.या वेळी आपल्याकडे अभिनेत्री क्षेत्रातील, व्यवसाय क्षेत्रातील,राज्य सरकार कार्यरत असणाऱ्या क्षेत्रातील, तसेच विविध क्षेत्रातील महिलाना आमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये अभिनय क्षेत्रातून मधुरा वेलणकर यांना यावेळी आमंत्रित करण्यात आले होते. मधुरा ताईबद्दल सांगायचे झाले तर, ती एक भारतीय अभिनेत्री आहे.तसेच ती ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांची कन्या असून ज्येष्ठ अभिनेते सीआयडी फेम शिवाजी साटम यांची सून आहे. त्याचबरोबर मधुरा ताईने तिची अभिनयाची सुरुवात बाल कलालकार म्हणून केली. आणि गेली २८ वर्षे ती या अभिनय क्षेत्रात काम करत आहे. तसेच ताई बॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहेच तर तिला चार वेळा राज्य पुरस्काराने सन्मानित केले आहे.



अभिनेते प्रदीप वेलणकर यांची मुलगी, तिने २००३ मध्ये गजेंद्र अहिरे दिग्दर्शित नॉट ओन्ली मिसेस राऊत या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.अधांतरी, सत्री या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. मातीच्या चुली, गोजिरी, मी अमृता बोलते, एक डाव धोबीपच्छाड, हापूस यांनी तिला दशकातील शीर्ष मराठी अभिनेत्रींपैकी एक म्हणून तिचे नाव घेतले जाते. त्यानंतर मधुराने पूर्णवेळ अभिनयातून विश्रांती घेतली. तिने मराठी दूरचित्रवाणी मालिकांमध्येही काम केले. तिने राष्ट्रपती भवन, महाराष्ट्र राज्य पुरस्कार, झी पुरस्कार, व्ही. शांताराम पुरस्कार आणि हिरकणी पुरस्कारांमध्ये नृत्यांगना म्हणून काम केले. तसेच ताईबद्दल सांगायचे तर तिने मोजक्याच पण तिला पटणाऱ्या भुमिला तिने वेळोवेळी साकारल्या आहे. दै. प्रहार सोबत गप्पा मारत असताना मधुरा ताईला पहिले पाकीट मिळाले असल्याने तिने तिच्या कार्याची सुरुवात २८ वर्षांपूर्वी झाली असे तिने सांगितले. तसेच माझा असा अभिनय क्षेत्रात काम करण्याचे असे काही ठरवले नव्हते, मी जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा मी खूप घाबारले होते आणि म्हणूनच मी घरी आल्यावर या क्षेत्रात काम करणार नाही असे ठासून सांगितले होते. मात्र घरातच नाटक, साहित्य, कला याच्याशी जवळचा संबंध असल्याने माझ्यावर या पद्धतीनेच संस्कार होत गेले असल्याने माझी वाटचाल देखील याच क्षेत्रात होत गेली. मराठीत काम करताना मला खूप आपलेसे आणि फ्री वाटायचे कारण परत आई-बाबा याच क्षेत्रातले असल्यामुळे सुरक्षित वाटायचे. त्यामुळे मराठी क्षेत्रात माझा जोम बसला. मी माझी पहिली मालिका मृण्मयी करत असताना पद्धतशीरपणे ऑडिशन देत ६० जणींमध्ये माझे सिलेक्शन झाले आणि माझा असा प्रवास माझ्या नावाने सुरु झाला. काम करत असताना कोणाचाही वरदहस्त जरी असला तरी आपली जडणघडण ही आपल्या कामावरून आणि मेहनतीवर ठरत असते.त्यामुळे स्वत:ला सिद्ध करायचे असल्या चिकाटी खुप महत्वाची असते असे मी मानते.


महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला सांगायला आवडेल की, आता सुरु असलेल्या मालिकामध्ये बाईला वेगळ्या रुपाने दाखवले जाते. यावेळेस तिने एक किस्सा देखील सांगितला, एका कार्यक्रमाला गेली असताना तुम्हाला भावंडे किती असता असा प्रश्न केला असताना मी सांगितले आम्ही तिघी बिहिणी, यावर मला प्रति प्रश्न विचारला गेला आणि तोही महिलेकडूनच की, तुम्हाला भाऊ नाही? यावर मला खंत अशी वाटते की, जेव्हा असे प्रश्न बाई विचारते तेव्हा ती अजूनही महिला पुढे गेलीच नाहीये. त्यामुळे अजूनही मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही केला जातो. त्याचबरोबर प्रवासाचा आलेख उलगडत असताना मला घरच्यांचा प्रचंड असा पाठिंबा मिळाला. यामध्ये प्रामुख्याने मी दोन्ही कुटुंबाचा उल्लेख करेन. तसेच बाईने कोणत्याही क्षेत्रात काम करायचे ठरवले तर ती ते काम चोख पार पाडू शकते असा विश्वास तिने पटवून दिला. महत्वाचे सांगायचे म्हणजे ताइला "मधुरव" हा ऑनलाइन शोसाठी कोविड योद्धा पुरस्कार हा राज्यपालांकडून मिळाला. अलीकडेच ताईने मराठी विषयात एमए केले.आणि नोव्हरेबल कम्युनिकेशनमध्ये पुढील शिक्षण चालू आहे. तसेच "मधुरव-बोरू ते ब्लॅाग " हा आता नवीन कार्यक्रम ज्याची निर्मिती दिग्दर्शन अभिनय या तिन्ही बाजू सांभाळणारी ज्याचे ३८ प्रयोग झाले.या क्षेत्राकडे बघताना मी येणाऱ्या नव्या पिढीला मी एकच सांगु इच्छिते की, तुम्हाला तुमच्यासाठी उभे रहावे लागते, मेहनत घ्यावी लागते तसेच कोणासाठी कुणी गोडफादर नसते. त्यामुळे मेहनत आणि जिद्द ही महतवाची असते . तसेच या क्षेत्रात ग्लॅमर असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न देखील अनेक वेळ उपस्थित केला जातो मात्र मी म्हणेन प्रत्येक क्षेत्रच असुरक्षित असते त्यामुळे बाईने किंवा महिलेने नाही म्हणणे शिकले पाहिजे. आणि आपल्या संस्काराशी तडजोड करु नका.

Comments
Add Comment

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई

शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) :

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना