Teachers Protest : शिक्षकांच्या मागण्यांसाठी शिक्षक, पदवीधर आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन

Share

मुंबई : शिक्षक व पदवीधर आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन (Teachers Protest) केले. या आंदोलनात आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार ज मो अभ्यंकर, आमदार जयंत आसगावकर, आमदार विक्रम काळे, आमदार किशोर दराडे, आमदार अभिजीत वंजारी, आमदार सुधाकर आडबाले, सहभागी झाले होते.

जोपर्यंत शासन शिक्षकांच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आमचा लढा (Teachers Protest) सुरूच राहणार असल्याचे यावेळी आमदार म्हात्रे यांनी सांगितले.

अशा आहेत मागण्या…

१. राज्यातील दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ रोजी शासन आदेश निर्गमित केलेल्या शाळांना पुढील टप्पा साठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद मिळावी.
२. दिनांक १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत आलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
३. संच मान्यतेचा जाचक शासन आदेश रद्द करावा.
४. समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा.

उशिरा का होईना आमदाराने घेतलेला निर्णय हा स्तुत्य आहे. परंतु एवढ्यावरून समस्या सुटणाऱ्या नाहीत. कारण मंत्रिमंडळात निर्णय झाला. शासन निर्णय निघाला. परंतु अंमलबजावणी निधी अभावी नाही, ही दादांची दादागिरी समाज घडवणाऱ्या शिक्षकांची फसवणूक करणारी आहे. – संजय सुंदरराव डावरे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित व अनुदानित शाळा कृती समिती मुंबई

Recent Posts

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

5 hours ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

5 hours ago

दीर्घकालीन गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे फायदे

डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…

5 hours ago

ऑटोजगताची भरारी, सोनेखरेदीची क्लृप्ती

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…

5 hours ago

‘आता हीच तर कुठे सुरुवात आहे…’

- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…

5 hours ago

नितीन गडकरींच्या एकलव्य एकल शाळांची ज्ञानगंगा गावोगावी…!

- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…

5 hours ago