बार्बाडोस : कोविड काळात भारताने दिलेली मदत आणि पाठिंबा याची जाणीव ठेवून बार्बाडोस सरकारने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांचा जाहीर गौरव केला. पंतप्रधान मोदी यांच्यावतीने ‘ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस’ हा पुरस्कार भारताचे परराष्ट्र आणि कापड उद्योग राज्यमंत्री पाबित्रा मार्गेरिटा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन बार्बाडोसचे सरकार आणि तिथल्या जनतेचे जाहीर आभार मानले. बार्बाडोस सरकारने दिलेला पुरस्कार म्हणजे कोट्यवधी भारतीयांचा सन्मान असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. एक्स पोस्ट करुन पंतप्रधान मोदी यांनी बार्बाडोसचे आभार मानले.
बार्बाडोसचे पंतप्रधान अमोर मोटले यांनी २० नोव्हेंबर २०२४ रोजी गुयानातील जॉर्जटाउनमध्ये भारत-कॅरिकॉम नेत्यांच्या शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी यांना सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा केली. हा पुरस्कार मार्च २०२५ मध्ये पंतप्रधान मोदी यांना प्रदान करण्यात आला.
कोविड-१९ साथीच्या काळात धोरणात्मक नेतृत्व आणि मौल्यवान मदतीसाठी पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार देण्यात आल्याचे बार्बाडोस सरकारने जाहीर केले. महामारी काळात मोदींच्या नेतृत्वात मिळालेल्या आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि पाठिंब्यामुळे बार्बाडोसला या संकटातून सावरण्यास मदत मिळाली, असेही बार्बाडोस सरकारने सांगितले.
पंतप्रधान मोदींच्यावतीने पुरस्कार स्वीकारल्यानंतर पाबित्रा मार्गेरिटा यांनी बार्बाडोस सकारविषयी कृतज्ञता व्यक्त केली. पंतप्रधान मोदींचे प्रतिनिधित्व करणे आणि त्यांच्या वतीने हा प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारणे ही माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे, असे पाबित्रा मार्गेरिटा यांनी सांगितले.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…