Parle-G : पार्ले-जीच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध बिस्किट उत्पादक कंपनी पार्ले प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या (Parle-G) विले पार्ले येथील कार्यालयावर आयकर विभागाने शुक्रवारी छापा टाकला. यासोबतच गुजरातमधील कच्छ येथील कंपनीच्या इतर कार्यालये आणि कारखान्यांवरही तपासणी सुरू आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार, या छाप्यांचे नेमके कारण अद्याप उघड करण्यात आलेले नाही. मात्र, केंद्रीय तपास संस्थेच्या आर्थिक शाखेच्या पथकाने कंपनीच्या (Parle-G) आर्थिक व्यवहारांची बारकाईने तपासणी सुरू केली आहे. ही तपासणी परकीय मालमत्ता युनिट आणि आयकर विभागाच्या तपास शाखेद्वारे करण्यात येत आहे.



पार्ले प्रॉडक्ट्सची (Parle-G) स्थापना १९२९ मध्ये झाली असून, कंपनीचे नाव मुंबईतील विले पार्ले परिसरावरून घेतले गेले आहे. १९३८ मध्ये कंपनीने ‘पार्ले-ग्लुको’ या नावाने बिस्किटांची विक्री सुरू केली होती, ज्याला नंतर ‘पार्ले-जी’ या नावाने मोठी लोकप्रियता मिळाली.

Comments
Add Comment

Cabinet sub-committee's decision : सामाजिक, राजकीय आंदोलनातील 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय

मुंबई: राज्यातील धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा निर्णय

Rashmi Shukla : रश्मी शुक्लांकडे नवी जबाबदारी, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या व्यवहारांवर राहणार करडी नजर

मुंबई : महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक (DGP) रश्मी शुक्ला यांच्यावर नव्या जबाबदारीची धुरा सोपवण्यात आली आहे.

Dharavi Redevelopment Vijay Singhal : विजय सिंघल यांची धारावी पुनर्वसनाच्या विशेष कार्य अधिकारी पदी नियुक्ती

- राज्य शासनाकडून १२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : राज्य सरकारने मंगळवारी (१६ जून) बारा सनदी

BMC APP : रस्त्यांवर खड्डे दिवसात का? करा माय बीएमसी मार्ग ऍपवर तक्रार

Mumbai : नागरिकांच्या तक्रारींचे जलद व प्रभावी निवारण करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने या वर्षी ‘MyBMC MARG’

BMC : घरकाम करणाऱ्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी पालिकेचे 'अ‍ॅप' विकसित करा; महिला व बाल कल्याण समिती अध्यक्षांची मागणी

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या महिला बचत गटातील सदस्यांना हक्काचा रोजगार

Industrial and commercial water usage : तरण तलाव, बांधकामांच्या ठिकाणच्या जलजोडण्या करणार खंडित

औद्योगिक व व्यावसायिक पाणी वापरात २० टक्के कपात मुंबई: पावसाळा लांबणीवर पडल्याने मुंबईत १५ मे २०२६ पासून १०