Health: हवामानातील अचानक बदलामुळे आजारी पडलाय? करा हे उपाय

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहेत. यामुळे लोकांच्या आरोग्यावर मात्र परिणाम होत आहेत. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे अनेक जण आजारी पडत आहेत. वातावरणातील बदलामुळे आपल्या इम्युनिटी सिस्टीम, तसेच श्वसन प्रणालीवर प्रभाव पडू शकतो. तसेच एलर्जीही वाढते.


थंड, गरम असे या वातावरणातील बदलामुळे शरीरावर तणाव पडतो. तसेच तापमान अचानक घसरते आणि शरीराचे मुख्य तापमान कायम राखण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. त्यामुळे आपण आजारी पडतो. तापमान आणि आर्द्रतेतील बदलाचा परिणाम इम्युनिटी सिस्टीमवर होतो. यामुळे आपण लगेचच आजारी पडतो.



सर्दी, फ्लूची लक्षणे


घश्यामध्ये खवखव
नाक वाहणे अथवा बंद होणे
खोकला
अंगदुखी
थकवा
डोकेदुखी



अ‍ॅलर्जीची लक्षणे


शिंका येणे
डोळ्यातून पाणी येणे अथवा खाज येणे
नाक गळणे
घश्यामध्ये खवखव
सायनसमध्ये दबाव




करा हे उपाय


हायड्रेशन : पातळ पदार्थ जसे पाणी, हर्बल चहा, सूपचे अधिक सेवन करा. हायड्रेट राहण्यासाठी भरपूर पाणी प्या. कोल्ड्रिंक पिण्याऐवजी फळांचा ज्यूस, सरबत यांना प्राधान्य द्या.

आराम करा - आपल्या शरीराला बरे होण्यासाठी वेळ द्या. आराम केल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते. तसेच आजारांपासून लढण्यास मदत मिळते.

वाफ घ्या - सर्दी, खोकल्याचा त्रास होत असेल तर वाफ घ्या. खासकरून तुमचे नाक बंद आहे अथवा सायनसचा त्रास होत असेल तर वाफारा घ्या.

मीठाच्या पाण्याने गुळण्या करा - जर तुमच्या घशात खवखव असेल तर कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा. यामुळे आराम पडू शकतो.
Comments
Add Comment

झोप न लागण्याची समस्या? या सवयी बदलतील तुमचं आयुष्य!

मुंबई : खरंतर, हल्लीच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे झोपेच्या समस्या खूपच वाढल्या आहेत. चुकीच्या

कार्डिओ व्यायाम करताना या चुका टाळा!

मुंबई : वजन कमी करायचं असो किंवा हृदयाचं आरोग्य राखायचं असो, अनेकजण कार्डिओ हा व्यायाम प्रकार निवडतात. पण अनेकदा

स्वस्त किंवा जुना प्रेशर कुकर वापरताय? तज्ज्ञांचा गंभीर इशारा! आरोग्यासाठी ठरू शकतो मोठा धोका

मुंबई: स्वयंपाकघरात रोज वापरला जाणारा प्रेशर कुकर तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. विशेषतः जर तुमचा कुकर

Health : फिटनेस आणि स्नायूंच्या बळकटीसाठी प्रोटीनयुक्त आहार आवश्यक, 'या' ५ पदार्थांचा आहारात करा समावेश

मुंबई: निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असेल, स्नायूंची निर्मिती करायची असेल किंवा वजन कमी करण्याचे ध्येय असेल, तर

तरुण दिसायचंय? आहारात 'या' फळांचा करा समावेश, त्वचा राहील चमकदार आणि निरोगी

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे अनेकांना अकाली वृद्धत्वाची लक्षणे

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात करा या बियांचा समावेश, हृदयविकाराचा धोका राहील दूर !

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत हृदयविकार हा एक सामान्य आणि चिंताजनक आजार बनला आहे. वयोगट कोणताही असो,