वर्ल्‍ड सस्‍टेनेबल डेव्‍हलपमेंट समिटला सुरुवात

  65

नवी दिल्ली : द एनर्जी अँड रिसोर्सेस् इन्स्टिट्यूट (टेरी)द्वारे आयोजित केले जाणारे वर्ल्‍ड सस्‍टेनेबल डेव्‍हलपमेंट समिट (डब्‍ल्‍यूएसडीएस)चे २४वे पर्व नवी दिल्‍लीमध्‍ये सुरू झाले. ‘पार्टनरशीप्‍स फॉर अॅक्‍सेलरेटिंग सस्‍टेनेबल डेव्‍हलपमेंट अँड क्‍लायमेट सोल्‍यूशन्‍स' थीम असलेले डब्‍ल्‍यूएसडीएस २०२५ सहयोगांना चालना देण्‍यासाठी आणि काही गंभीर पर्यावरणीय आव्‍हानांसाठी सोल्‍यूशन्‍सचा शोध घेण्‍यासाठी जागतिक प्रमुख, धोरणकर्ते, उद्योग तज्ञ व इतर भागधारकांना एकत्र आणते.



स्‍वागताचे भाषण सादर करत टेरीचे अध्‍यक्ष नितीन देसाई यांनी जागतिक शाश्‍वतता चर्चेला आकार देण्‍यामध्‍ये समिटच्‍या भूमिकेला निदर्शनास आणले. ते म्‍हणाले, “टेरी शाश्‍वत विकासाला गती देणाऱ्या सहयोगांना चालना देण्यासाठी आवश्यक पावले ओळखण्यावर लक्ष केंद्रित करते.''

टेरीच्‍या महासंचालक डॉ. विभा धवन यांनी हवामान आव्‍हानांचे निराकरण करण्‍यामध्‍ये सहयोग आणि नाविन्‍यतेच्‍या महत्त्वावर भर दिला. त्‍या म्‍हणाल्‍या, “हवामान बदलाचा प्रत्येक नागरिकावर परिणाम होतो, विशेषतः विकसनशील देशांमध्ये त्‍याचे परिणाम विभिन्‍न असतात. म्हणून, आम्हाला विश्‍वास आहे की जागतिक सहयोग महत्त्वाचे असतील. महामारीच्या काळात आम्हाला समजले की, आपण एकत्र काम करतो तेव्हा उपाय शोधणे शक्य होते.''

उद्घाटनाचे भाषण सादर करत पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी पर्यावरणीय व्यवस्थापन आणि शाश्‍वततेसाठी भारताच्या कटिबद्धतेची पुष्‍टी केली. त्यांनी प्रजातीवादाच्या समस्येला तोंड देण्याची गरज पुन्हा व्यक्‍त केली, जो वंशवादाप्रमाणेच इतर प्रजाती आणि परिसंस्थांच्या कल्याणापेक्षा मानवी हितांना प्राधान्य देतो. ते म्‍हणाले, “सर्व प्रकारच्‍या सजीवांना समान महत्त्व दिले जाईल आणि पर्यावरणीय धोरणे वन्यजीव आणि जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करण्‍यास अनुकूल असतील तेव्‍हाच खरी शाश्‍वतता संपादित होऊ शकते. पर्यावरणीय शाश्‍वतता वाढवण्यासाठी सहयोग हा फक्‍त पर्याय नाही तर गरज आहे. कृती करण्याची वेळ आता आली आहे.''

गयानाचे पंतप्रधान महामहिम ब्रिगेडियर (निवृत्त) मार्क फिलिप्स यांनी बीजभाषण सादर केले आणि शाश्‍वततेच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आंतरराष्‍ट्रीय सहयोगांच्‍या महत्त्वाबाबत सांगितले. ते म्‍हणाले, “गयाना हे शाश्‍वततेच्या शोधात नेतृत्व, सहयोग आणि प्रगतीचे उदाहरण आहे. गयानामध्ये पर्यावरणीय शाश्‍वततेला प्राधान्‍य देत विकास केला जातो.''

ब्राझीलच्‍या पर्यावरण व हवामान बदल मंत्री मरीना सिल्वा यांनी देखील भाषण सादर केले, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी जागतिक सहयोगाच्‍या महत्त्वावर भर दिला. त्‍या म्‍हणाल्‍या, “सीओपी३० कडे वाटचाल करत असताना आपण दुबई आणि बाकूमध्ये केलेल्या कटिबद्धतेच्या अंमलबजावणीला गती दिली पाहिजे. हवामान वित्तपुरवठ्याच्‍या दिशेने पाऊल टाकताना आपण जीवाश्म इंधनांमधील परिवर्तनाला गती दिली पाहिजे.''

टेरीचा वार्षिक प्रमुख कार्यक्रम डब्‍ल्‍यूएसडीएसने शाश्‍वत विकास संवाद आणि कृती पुढे नेण्यासाठी अग्रगण्य जागतिक व्यासपीठ म्हणून स्वतःला स्थापित केले आहे. गेल्या काही वर्षांत डब्‍ल्‍यूएसडीएसने जगभरातील उच्‍च-स्तरीय मान्यवरांना एकत्र आणले आहे, ज्यात राज्यप्रमुख, मंत्री, उद्योग नेते आणि विद्वान यांचा समावेश आहे, ज्‍यामुळे ते पर्यावरणीय समस्यांवर चर्चा करू शकतात आणि कृतीयोग्य उपाय रचू शकतात. धोरणांना आकार देण्यासाठी, निर्णय घेण्यावर प्रभाव पाडण्यासाठी आणि हवामान कृतीला गती देणाऱ्या सहयोगांना चालना देण्यासाठी हे समिट प्रमुख स्रोत म्हणून काम करते.
Comments
Add Comment

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय