मुंबई : मुंबईतील (Mumbai News) रस्ते काँक्रिटीकरणाची (Road concreting) कामे वेगाने सुरू आहेत. रस्ते विकसित करतानाच उपयोगिता वाहिन्यांचीही कामे सुरू आहेत. एकदा रस्त्याचा विकास झाला की, त्या रस्त्यावर खोदकाम, चर करायला तत्काळ प्रभावाने मनाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे काँक्रिटीकरणासाठी नव्याने रस्ते खोदकाम करू नये, असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांनी दिले आहेत.
मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात एकूण ३२४ किलोमीटर (६९८ रस्ते), तर दुसऱ्या टप्प्यात ३७७ किलोमीटर (१४२० रस्ते) असे एकूण मिळून ७०१ किलोमीटर रस्ते काँक्रिटीकरण्यासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये शहर विभाग, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरातील रस्त्यांचा समावेश आहे. टप्पा १ मधील ७५ टक्के कामे आणि टप्पा २ मधील ५० टक्के कामे ३१ मे २०२५ पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
सर्व परिमंडळ उपआयुक्त, विभागीय सहायक आयुक्त, प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक), प्रमुख अभियंता (पूल), प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या), जल अभियंता, नगर अभियंता, प्रमुख अभियंता (मलनिस्सारण प्रचालन), प्रमुख अभियंता (पाणीपुरवठा प्रकल्प), प्रमुख अभियंता (विकास नियोजन) आदी खात्यांनी या निर्देशांचे पालन करावे, असे महानगरपालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते (Road concreting) कामांचा २७ फेब्रुवारी २०२५ रोजी आढावा घेतला. अधिकारी, कंत्राटदार व गुणवत्ता नियंत्रण संस्थेचे प्रतिनिधी यांची बैठक घेऊन रस्ते कामांना अधिक गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी ३१ मे २०२५ नंतर कोणत्याही नवीन रस्त्यांचे खोदकाम करण्यास मनाई करण्यात आली आहे.
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…