मंत्री नितेश राणे यांनी आमदार आदित्य ठाकरेंना ठोकले
मुंबई : मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज माध्यमांशी बोलताना आमदार आदित्य ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला. ‘केम छो वरळी’चे बॅनर लावणाऱ्यांनी आणि उर्दू भाषेत प्रचार पत्रके छापणाऱ्यांनी, ‘अजान स्पर्धा’ घेणाऱ्यांनी मराठी (Marathi) भाषेवर बोलण्याचा किंवा आमदार भैयाजी जोशींवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असे मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना सुनावले. एवढेच नाही तर मराठी भाषेवर आदित्य ठाकरे यांनी बोलूच नये, अशी टीका मंत्री राणे यांनी केली.
तसेच शिवरायांचा अपमान करणा-या जितेंद्र आव्हाडांवर कारवाई का केली नाही. राहून गांधींवर कारवाईची मागणी का केली नाही, असा थेट सवाल सुद्धा मंत्री नितेश राणे यांनी (Nitesh Rane) केला.
मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले, आमदार आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीदरम्यान स्वतःच्या वरळी मतदारसंघांमध्ये “केम छो वरळी” असे बॅनर लावले होते, अशा व्यक्तींनी मराठी भाषेवर प्रेम दाखवणं हे खरं म्हटलं तर आश्चर्य आहे. तसेच उर्दू भाषेत प्रचार पत्रके छापणाऱ्या उबाठा गटाने मराठी प्रेम दाखवणे देखील आश्चर्यच आहे.
मराठी आमच्या राज्याची प्रमुख भाषा आहे. मराठी भाषेलाच आम्ही प्राधान्य देतो. राज्यातल्या अन्य भाषांचा अपमान न करता व त्यांच्या भावना न दुखावता मराठी भाषेला प्राधान्य देणे ही आमच्या शासनाची भूमिका आहे.
कोरटकर असो की कोणीही असो, छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांच्याविषयी चुकीची वक्तव्य करणाऱ्याला आमचे शासन कडक शिक्षा करणार हे निश्चित.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर व त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही आमचे राज्य चालवत आहोत, त्या राजाचा कोण अपमान करत असेल तर यापेक्षा मोठी शिक्षा असू शकत नाही, म्हणून अशा व्यक्तींना आमचा देवाभाऊच्या सरकारमध्ये कडक शिक्षा केली जाईल, ही आमची भूमिका ठाम आहे, असेही नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले.