मुंबई: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या फायनलची तारीख, संघांची नावे आणि ठिकाण समोर आले आहे. आता केवळ ९ मार्चची प्रतीक्षा आहे. दुबईच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंडचे संघ आमनेसामने येणार आहे. ही काही पहिलीच वेळ नाही की भारत आणि न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भिडणार आहेत.
याआधी २०००मध्ये खेळवण्यात आलेल्या स्पर्धेत न्यूझीलंडने भारताला हरवत खिताब जिंकला होता. दरम्यान,आता जाणून घेऊया की २०२५च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलसाठी दुबईची पिच कशी काम करणार आहे तसेच गोलंदाजी, फलंदाजी कोणाला अधिक साथ देईल.
दुबईचा पिच रिपोर्ट, कोण मारणार बाजी?
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या सुरूवातीपासूनच दुबईची पिच फलंदाजांना त्रासदायक ठरत आहेत. संपूर्ण स्पर्धेत येथे सर्वोच्च धावसंख्या करणारा संघ भारतच आहे. भारताने सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवत फायनल गाठसी आहे. भारत-न्यूझीलंड फायनल सामनाही प्रत्येक वेळेप्रमाणेच नव्या बॉलने प्रभावी ठरू शकतो. आतापर्यंत पाहिले गेले आहे की १०-१५ षटके झाल्यानंतर दुबईत स्पिनर्स आपले जाळे टाकतात. पिचची स्थिती पाहा येथे टॉस जिंकणारा संघ पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेऊ शकते.