Friday, April 18, 2025
HomeदेशTerrorist attack : अयोध्या पाकड्यांच्या हिटलिस्टवर, बदल्यासाठी चाललेय दहशतवादी हल्ल्याची तयारी

Terrorist attack : अयोध्या पाकड्यांच्या हिटलिस्टवर, बदल्यासाठी चाललेय दहशतवादी हल्ल्याची तयारी

उत्तरप्रदेशातून अटक केलेल्या खलिस्तानी दहशतवाद्याकडून मिळाली माहिती

कौशंबी : उत्तरप्रदेशच्या कौशंबी येथे आज, गुरुवारी पहाटे बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या (बीकेआय) दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. उत्तरप्रदेश एसटीएफ आणि पंजाब पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई कुख्यात दहशतवादी लाजर मसीह याला अटक केली आहे. लाजरकडून मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येतील राम मंदिर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असून अयोध्येत (Ayodhya) दहशतवादी हल्ला (terrorist attack) करण्यासाठी पाकिस्तानची गुप्‍तचर संस्‍था आयएसआय आणि इस्लामिक स्टेट इन इराक अँड सीरिया (आयएसआयएस) या दहशतवादी संघटनांनी कट रचला आहे. यासाठी त्यांची जोरदार तयारी सुरू असल्याचे समजते.

मसीह हा पाकिस्तानची गुप्‍तचर संस्‍था आयएसआयच्‍या थेट संपर्कात

दहशतवादी लाजर मसीह हा बीकेआयच्या जर्मन-आधारित मॉड्यूलचा प्रमुख स्वर्ण सिंग उर्फ ​​जीवन फौजीसाठी काम करत होता. तो पाकिस्तानची गुप्‍तचर संस्‍था आयएसआयच्‍या थेट संपर्कात होता. मसीह याच्‍याकडून ३ जिवंत हँडग्रेनेड, दोन डेटोनेटर्स, १३ काडतुसे, विदेशी पिस्तूल आणि स्फोटक पदार्थाची पावडर जप्त करण्यात आली आहे. त्‍याच्‍याकडे गाझियाबादचा पत्ता असलेले आधार कार्ड आणि एक मोबाईल फोनही (सिम कार्डशिवाय) सापडला आहे.

Satara : आईच्या आग्रहाने वाचले मुलाचे प्राण!

२४ सप्टेंबर २०२४ रोजी न्यायालयीन कोठडीतून पळून गेला होता

लाजर मसीह हा पंजाबमधील अमृतसरमधील रामदास भागातील कुर्लियान गावचा रहिवासी असल्याचे सांगितले जाते. दहशतवादी लाजर मसीह हा पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या आयएसआयच्या संपर्कात होता. तो २४ सप्टेंबर २०२४ रोजी न्यायालयीन कोठडीतून पळून गेला होता.

अब्दुल रहमानला दिले होते अयोध्या राम मंदिरावर हल्ला करण्यासाठी प्रशिक्षण 

यापूर्वी, ३ मार्च रोजी हरियाणातील फरीदाबाद येथील बान्स रोड पाली येथून अब्दुल रहमान नामक जिहादी दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती. इस्लामिक स्टेट इन इराक अँड सीरिया (आयएसआयएस) या दहशतवादी संघटनेने अब्दुल रहमानला अयोध्या राम मंदिरावर हल्ला करण्यासाठी प्रशिक्षण दिले होते. आयएसआयएसची शाखा असलेल्या इस्लामिक स्टेट-खोरासान प्रांताने या हल्ल्याचा कट रचल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

अब्दुल होता आयएसआयएसच्या संपर्कात

अब्दुल गेल्या अनेक महिन्यांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून आयएसआयएसच्या संपर्कात होता. एका सोशल मीडिया ग्रुपमध्ये एका विशिष्ट धर्माला दुखावणारे व्हिडिओ पोस्ट केले गेले होते. वेगवेगळ्या व्यक्तींकडून काही रेकॉर्ड केलेले व्हिडिओ संदेशही ग्रुपमधील लोकांना पाठवण्यात आले होते. या संदेशांमध्ये अब्दुल आणि त्याच्यासारख्या इतर तरुणांना सांगण्यात आले होते की, अयोध्येत तुमच्यावर अत्याचार झाले आहेत आणि आता तुम्हाला त्याचा बदला घ्यावा लागेल. त्याचप्रमाणे, ते हल्ल्यासाठी तयार करत असल्‍याचेही तपासात स्‍पष्‍ट झाले असल्‍याचे सूत्रांनी म्‍हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -