सातारा : प्रत्येक आईला तिच्या लेकाचं भविष्य दिसतं असे म्हटले जाते. त्यामुळे आईला देवाचं दुसरं रुप मानलं जातं. हिच घटना सत्यात उतरल्याचे समोर आले आहे. राज्यभरात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. या अपघातग्रस्तांमध्ये विना हेल्मेट दुचाकी चालक आणि त्याच्या मागे बसलेल्यांची संख्या अधिक आहे. यात अनेकांचा जीवही गेलेला आहे. त्यामुळे प्रशासनाने हेल्मेट घालण्याची सक्ती केली आहे. मात्र तरीही अनेक तरुण हेल्मेट न घालता प्रवास करताना दिसून येतात. अशीच काहीशी घटना साताऱ्यात घडली आहे.
‘मुंबई श्री’च्या खेळाडूंना आशियाई स्पर्धेसाठी खानविलकरांचे आर्थिक पाठबळ
साताऱ्यातील मोळाचा ओढा परिसरातील सूरज जाधव (२४) हा तरुण त्याचा मित्र पिंटू ऊर्फ राजेश रिदि (२४) यासह दुचाकीवरुन पुण्याला निघाला होता. मात्र यावेळी तो हेल्मेट न घालता घराबाहेर पडला. हेल्मेट न घेता मुलगा घरातून बाहेर गेला मुलान हेल्मेट घालावं, असं आईला मनोमन वाटत होत. ‘हेल्मेट घालूनच गाडी चालव’ असा आग्रह देखील सूरजच्या आईने धरला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून तो तसाच निघाला. आईला घरात हेल्मेट दिसल्याने ती स्वत: पाठोपाठ हेल्मेट घेऊन निघली. मुलाला जिथे आहे, तिथेच थांबण्यास सांगितले. पुढे गेला असशील, तर मी तिथपर्यंत येते, असाही आग्रह आईने धरला. त्यामुळे सूरजने दुचाकी पुन्हा साताऱ्याच्या दिशेने वळवली आणि घरी येऊन हेल्मेट घेतले.
सूरजने घरातून निघताना ‘आई, मी नेहमीच गाडीवरून जातो. कशाला टेन्शन घेतेस? असं तो म्हणाला. मात्र काही सांगू नकोस. तू हेल्मेट डोक्यात घाल आणि आणि पोहोचल्यानंतर फोन कर. असं सांगत आईनं मुलाला निरोप दिला. परंतु अवघ्या दिड तासात आईचा फोन खणखणला. तुमच्या मुलाचा अपघात झाला. दोघांनाही पुण्याला हलवलंय. ते ऐकून आईच्या पायाखालची जमीन हादरली. शेजाऱ्यांन सोबत ती बसने पुण्याला निघाली. बसमध्ये बसतानाच पुन्हा फोन वाजला. यावेळी ”आई, मी सूरज बोलतोय, आमचा अपघात झालाय. मी ठीक आहे. पण, पिंटूला खूप लागलंय. त्याला पुण्याला अॅडमिट करतोय. आई तू हेल्मेट दिल्यामुळे माला काहीही झालं नाही. परंतु पिंटूने हेल्मेट न घातल्यामुळे तो कोमा गेला आहे”. सूरजने असे सांगताच आईच्या जीवात जीव आला.
त्यानंतर सूरजची आई पुण्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर मुलाला सुखरूप पाहताच आईने कडकडून मिठी मारली. मात्र, सूरजचा मित्र राजेश या अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे या आईच्या एका डोळ्यांत आसू आणि दुसऱ्या डोळ्यांत हसू अशी अवस्था निर्माण झाली होती.