‘उंटावरचे शहाणे’ चित्रपटाच्या चित्रीकरणाचा भव्य मुहूर्त सोहळा संपन्न

मुंबई : मराठीत अनेक अर्थपूर्ण म्हणी आहेत, पण ‘उंटावरचा शहाणा’ म्हणीला एका वेगळ्या ढंगात विनोदी स्वरूप देणारा ‘उंटावरचे शहाणे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या (Marathi Movie) भेटीला येत आहे. सौम्या प्रोडक्शनच्या निर्मितीखाली तयार होणाऱ्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ दिमाखदार सोहळ्यात पार पडला. (Entertainment)



चित्रपटाचे निर्माते प्रशांत अनिल गवळी, दिग्दर्शक शुभम सुनील दळवी, छायाचित्रकार के. विजय, कार्यकारी निर्माता विष्णु घोरपडे, आणि लाइन प्रोड्यूसर बजरंग मासाळ यांच्या उपस्थितीत मुहूर्ताचा सोहळा संपन्न झाला. चित्रपटाच्या शीर्षकाप्रमाणेच हा एक हलकाफुलका, विनोदी आणि मनोरंजनाने भरलेला प्रवास असणार आहे.


‘उंटावरचा शहाणा’ ही मराठी म्हण आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या विसंगत आणि गंमतीशीर प्रसंगांवर मार्मिक भाष्य करणारी आहे. आणि हाच पैलू या चित्रपटात मनोरंजक पद्धतीने दाखवला जाणार आहे. समाजातील गमतीशीर आणि विसंगत गोष्टींवर हास्याचा चपखल तडका देत हा सिनेमा प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणार आहे.


"‘उंटावरचे शहाणे’ हा केवळ विनोदी चित्रपट नसून, तो आपल्या भोवतालच्या जगाकडे मिश्किल नजरेने पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देईल. प्रेक्षकांना हलकं-फुलकं आणि ताजेतवाने करणारे मनोरंजन देण्याचा आमचा प्रयत्न असेल. या सिनेमाच्या माध्यमातून समाजातील काही विसंगतींवर हसत-हसत भाष्य करताना, त्यातून एक महत्त्वाचा संदेशही देण्याचा आमचा मानस आहे." असे दिग्दर्शक शुभम सुनील दळवी म्हणाले.


चित्रपटाच्या टीमकडून लवकरच कलाकारांच्या नावांची घोषणा करण्यात येणार आहे. या अनोख्या संकल्पनेवर आधारित चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली असून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Comments
Add Comment

‘तो ती आणि फुजी’ पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुपरहिट

पुणे : शिलादित्य बोरा निर्मित आणि मोहित टकळकर दिग्दर्शित मराठी–जापानी चित्रपट ‘तो ती आणि फुजी’चा २४व्या पुणे

साईबाबांच्या पालखीच्या प्रवासातील साई भक्तांच्या अढळ श्रद्धेवर आणि भक्तीवर आधारित , 'पालखी' चित्रपटाचा मुहूर्त

मुंबई : श्रद्धा ही केवळ भावना नाही, ती आयुष्याला नवी दिशा देणारी शक्ती आहे. साईबाबांच्या कृपेवर आणि अढळ

करण जौहरचा चित्रपट ऑस्कर 2026 मधुन बाहेर;चाहत्यांमध्ये निराशा..

मुंबई :ऑस्कर २०२६, ९८व्या अकॅडमी अवॉर्ड्सच्या नामांकनांची अधिकृत यादी जाहीर झाली असून, भारताकडून अधिकृत प्रवेश

भय आणि भ्रमाच्या विळख्यातला थरार ‘सालबर्डी’

मुंबई : इतिहासाच्या गर्भात दडलेल्या अनेक रहस्यांचा कधीच शोध लागत नाही, ती नेहमीच अनुत्तरीतच रहातात. काहींचा शोध

मराठी मनोरंजनाचा समृद्ध खजिना घेऊन 'नाफा स्ट्रीम'ची नॉर्थ अमेरिकेत धडाकेबाज एंट्री!

सॅन होजे (मनोरंजन प्रतिनिधी) : राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या गाजलेल्या चित्रपटांचे

फरहान अख्तर अभिनीत ‘120 बहादूर’पासून सनी देओलच्या ‘बॉर्डर’पर्यंत – या प्रजासत्ताक दिनी पाहा 7 देशभक्तीपर चित्रपट

प्रजासत्ताक दिन विशेष: फरहान अख्तर अभिनीत ‘120 बहादूर’पासून सनी देओलच्या ‘बॉर्डर’पर्यंत – हे सात प्रेरणादायी