नाशिक परिमंडलातील ९ हजार ७२४ ग्राहक थकबाकीतून मुक्त

११ कोटी ३३ लाख रुपयांचा भरणा; अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन


नाशिक : महावितरणने वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या थकीत वीज बिल ग्राहकांसाठी अभय योजना जाहीर केली असून अभय योजना २०२४ नुसार थकबाकी एकरकमी भरल्यास थकबाकी वरील व्याज आणि विलंब आकारात सूट देण्यात येणार आहे. नाशिक परिमंडळात ९ हजार ७२४ ग्राहकांनी ११ कोटी ३३ लाख रुपयाचा भरणा करून थकबाकीतून कायमची मुक्ती मिळविली असून नवीन वीज जोडणी मिळण्यासाठी ते पात्र झाले आहेत. योजनेचा लाभ ३१ मार्च २०२५ पर्यंत थकबाकी भरून घेता येणार आहे.


नाशिक मंडळात ४ हजार ४०२ ग्राहकांनी ४ कोटी ६७ लाख, मालेगांव मंडळात १ हजार ४०५ ग्राहकांनी १ कोटी २७ लाख आणि अहिल्यानगर मंडळात एकूण ३ हजार ९१७ ग्राहकांनी ५ कोटी ३८ लाख रुपयाचा भरणा केला आहे. अशाप्रकारे नाशिक परिमंडळात एकूण ९ हजार ७२४ ग्राहकांनी ११ कोटी ३३ लाख रुपयाचा भरणा करून थकबाकीतून कायमची मुक्ती मिळविली आहे.



३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित झालेल्या (पीडी) घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी ही ही योजना आहे. थकित बिलांच्या योजनेत कृषी ग्राहकांचा समावेश नाही. या योजनेत वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थकित बिलाच्या मूळ रकमेवरील व्याज आणि विलंब आकाराच्या स्वरुपातील दंड माफ करण्यात येणार आहे. वीजबिलाचा वाद न्यायप्रविष्ट असलेल्या पीडी ग्राहकांनाही या योजनेचा काही अटी व शर्तीवर लाभ घेता येईल. मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून ऊर्वरित ७० टक्के रक्कम सहा हप्त्यात भरायची सवलत ग्राहकांना मिळेल. जे घरगुती, व्यावसायिक इत्यादी लघुदाब ग्राहक एक रकमी थकित बिल भरतील त्यांना दहा टक्के सवलत देण्यात येईल. उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत मिळेल.


संबंधित वीज ग्राहकांना www.mahadiscom.in/wss/wss या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अभय योजनेचा लाभ घेता येईल. महावितरणच्या मोबाईल ऍपवरून योजनेचा लाभ घेता येईल. वीज ग्राहक १९१२ किंवा १८००२३३३४३५ किंवा १८००२१२३४३५ या टोल फ्री क्रमांकावर फोन करून आणि महावितरण कार्यालयात संपर्क करून ही माहिती घेऊ शकतात.


जिल्ह्यातील थकबाकीमुक्त ग्राहकांची संख्या


विभाग - सहभागी ग्राहक - भरणा रक्कम रु. (लाखात)


कळवण - ११७ - (रु. १०.७५),


मालेगांव - ५५७ - (रु. ५०.९३),


मनमाड - ३४९ - (रु. २८.४७),


सटाणा - ३८२ - (रु. ३७.२५),


चांदवड - १०१५ - (रु. ५७.२२),


नाशिक शहर १ - ३१५ - (रु. ७२.७६),


नाशिक शहर २ - ७६६ - (रु. १४३.६३),


नाशिक ग्रामीण - २,३०६ - (रु. १९४.१६),


नाशिक जिल्हा एकूण - ५८०७ - (रु. ५ कोटी ९५ लाख)

Comments
Add Comment

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' तारखेला शहरात पाणीपुरवठा राहणार बंद

नाशिक: पाण्यासंदर्भात नाशिककरांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुढील काही दिवस नाशिककरांनी पाण्याचा जपून

नायलॉन मांजा विकणाऱ्याला अडीच लाखांचा दंड ?

उच्च न्यायालयाची कठोर भूमिका; ५ जानेवारीच्या सुनावणीकडे लक्ष नाशिक : नायलॉन मांजाचा वापर हा मानवी,

नाशिकमध्ये एबी फॉर्म वाटपावरून गोंधळ

शहराध्यक्षांच्या गाडीचा फिल्मी पाठलाग; अखेर पोलीस बंदोबस्तात एबी फॉर्मचे वितरण मयूर बारागजे  सिडको : महापालिका

वेगवान बहिरी ससाणा नांदूर मधमेश्वर अभयारण्यात!

ताशी २९० किमीचा वेग नाशिक : हवेत अविश्वसनीय वेगाने झेपावणारा, पृथ्वीतलावरील सर्वात वेगवान म्हणून ओळखला जाणारा

नाशिक २०२७ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर द्वारका चौक सुधारणा प्रकल्पास २१४ कोटींची मंजुरी

नाशिक शहरातील द्वारका चौक होणार वाहतूक कोंडी मुक्त शहर नाशिक : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

जन्मदात्या आईनेच विकले सहा चिमुरडे

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी येथे हादरवणारी घटना नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव