मुंबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मध्ये दुसरा सेमीफायनलचा सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवला जात आहे. हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ३६३ धावांचे आव्हान दिले आहे.
न्यूझीलंडने ५० षटकांत ६ बाद ३६२ धावा केल्या. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड तोडला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या हंगामात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध ५ बाद ३५६ धावा केल्या होत्या.
दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील विजेता संघ फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. त्यांचा मुकाबला रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाशी होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा फायनल सामना ९ मार्चला दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाईल. याआधी पहिल्या सेमीफायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला ४ विकेट राखत हरवले होते.
टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५० षटकांत ६ बाद ३६२ धावा केल्या. सामन्यात न्यूझीलंडची सुरूवात चांगली राहिली. विल यंग आणि रचिन रवींद्रने मिळून ७.५ षटकांत ४८ धावांची भागीदारी केली. यंग २२ धावा करून परतला. त्यानंतर केन विल्यमसन्स आणि रचिन रवींद्रने दुसऱ्या विकेटसाठी १६४ धावांची भागीदारी केली.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…