Sunday, May 11, 2025

महामुंबईमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरांवर आता पती-पत्नीचं नाव

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरांवर आता पती-पत्नीचं नाव
मुंबई : जागतिक महिला दिन ८ मार्च रोजी आहे. या दिवसाच्या पार्श्वभूमीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत एक महत्त्वाचा निर्णय झाला आहे. या निर्णयानुसार झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरांवर आता पती आणि पत्नी अशी दोघांच्याही नावाची नोंद केली जाणार आहे. संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात हा नियम झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसाठी लागू असेल.



झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या नव्या नियमानुसार पुनर्विकासात मिळणारे घर पती-पत्नी यांच्या संयुक्त नावे करणे बंधनकारक आहे. संपत्तीत पती आणि पत्नी या दोघांचाही वाटा असल्याचे समजतात. याच पद्धतीने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरांवर आता पती आणि पत्नी या दोघांचाही हक्क असेल.



घरावर पती आणि पत्नीचे हक्क असल्यास कायदेशीर अडचणी येत नाही. मात्र, काही प्रकरणात अशी नावांची नोंद नसल्यास पतीच्या निधनानंतर महिलेस कायदेशीर अडचणींना तोंड द्यावे लागते. ही समस्या सोडवण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरांवर आता पती आणि पत्नी अशी दोघांच्याही नावाची संयुक्त नोंद करण्याचा निर्णय झाला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या परिशिष्ट-२ मध्ये यासाठी बदल करण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता घरांचे वितरण करताना घरांच्या वाटपपत्रावर पती-पत्नीवर दोघांची नावे नोंद करुन घरे वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Comments
Add Comment