
निवडणूक प्रकरणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर
नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था प्रकरणाची सुनावणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) काही मिनिटे पार पडली. मात्र, दोन्ही बाजूंना आपले म्हणणे स्पष्टपणे न मांडता आल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आणि पुन्हा एकदा ही सुनावणी लांबणीवर पडली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local body elections) आता पावसाळ्यापूर्वी होण्याची शक्यता कमी असल्याचे कायदा क्षेत्रातील जाणकरांचे मत आहे.

मुंबई : पोकोने गेमिंग, रील्स, सोशल मीडिया, सेल्फी, फोटोसाठी उपयुक्त ५जी स्मार्टफोन ९९९९ रुपयांत उपलब्ध करुन दिला आहे. पोको एम७ ५जी त्याच्या ...
मंगळवारच्या सुनावणीत सुरुवातीलाच सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी राज्य सरकारच्या वतीने न्यायालयाला दोन दिवसांचा वेळ मागितला होता. यावर न्यायालयाने दोन्ही बाजूंना या प्रकरणासंबंधी विचारणा केली. त्यामुळे आता पावसाळ्यानंतरच या निवडणुका होण्याची शक्यता असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पुढील सुनावणी ६ मे रोजी होणार आहे.